corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

Corona Update : कळंबमध्ये १५ रुग्ण वाढले; १२ जण कोरोनामुक्त झाले 

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून तालुक्यातील भाटशीरपुरा येथील ६० वर्षीय व्यक्तीचा शनिवार (ता.८) सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर १५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आता तालुक्यातील कोरोना बळीचा आकडा तीनवर गेला आहे. शनिवार( ता. ८) १२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्यस्थितीत ८६ जनावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. स्वप्नील शिंदे यांनी दिली. 

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे धमाके सुरूच असून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबादच्या लॅबकडून शहर व ग्रामीण भागात शनिवारी नवे १५ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाला. यात शहरातील सोनार गल्लीतील ३, खाटीक गल्लीतील एक, तालुक्यातील रत्नापुर, चोराखळी येथील प्रत्येकी ४, डिकसळ, वडगाव, निपाणी, येरमळातील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले.

६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू 

कोरोनामूळे मृत्यू जाणार्यांचे प्रमाण वाढत आहे. शनिवारी तालुक्यातील भाटशीरपुरा येथील ६० वर्षीय व्यक्तीवर सोलापूर येथे औषध उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा तीनवर गेला आहे.
महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड  

शनिवारी १२ जणाला डिस्चार्ज 
येथील तांदुळवाडी रस्त्यावरील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केंद्रातील कोविड सेंटर मध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू असून १२ जणांना नियमानुसार डिस्चार्ज देण्यात आला असून ८६ जणांवर उपचार सुरू आहेत.

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT