us shetkari.jpg 
मराठवाडा

कळंब तालुक्यातील ऊस शेतकरी आर्थिक संकटात, या दोन साखर कारखाण्याकडून बील मिळेना

दिलीप गंभीरे

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्याची ऊस बिले दोन साखर कारखान्यांकडून जमा करण्यास दिरंगाई करण्यात येत असून या दोन कारखान्यांनी ऊस बिले थकीत ठेवली आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. या कारखान्याने शेतकऱ्याचे करोडो रूपये थकविले आहेत.

तालुक्यात गेल्यावर्षीच्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे उसाची लागवड कमी प्रमाणात करण्यात आली होती. पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांकडे ऊसाचे क्षेत्र पहावयास मिळत होते. उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे तालुक्यातील हावरगाव येथील डीडीएन शुगर-दोन व रांजणी येथील एनसाई या कारखान्याचे बॉयलर पेटविण्यात आले नव्हते. 

चोराखळी येथील धाराशिव आणि वाशी येथील शिवशक्ती-भैरवनाथ या दोन साखर कारखान्याचे २०१९ मध्ये गाळप सुरू झाले होते. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱयांनी या दोन साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला. 

शेतकऱ्यांनी ऊस गाळपास दिल्यानंतर १४ दिवसाच्या आत ऊस बिले जमा करावीत अशी सूचना शासनाकडून करण्यात आली आहे. तरीही ऊस बिले देण्यास टाळाटाळ होत असून प्रत्येक वर्षी शेतकऱयांना ऊस बिले देण्यास विलंब होत आहे. त्यामुळे ऊस बिले मिळविण्यासाठी शेतकरी व शेतकरी संघटनांना आंदोलने करावी लागतात. यावेळी मात्र कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शेतकऱयांना आंदोलने करता आली नाहीत. टाळेबंदी चे कारण पुढे करत शेकडो शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची उसबिले या कारखान्यांनी थकीत ठेवली आहेत. नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात गाळप केलेल्या उसाची काही कारखाण्याकडे एफआरपी प्रमाणे रक्कम थकीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपला आहे. तरीही ऊस बिले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकरी मोठ्या अर्थीक संकटात सापडले आहेत.

 शेतकऱ्याचा नेत्यांना फुकट कळवळा

बहुतांश कारखाने हे नेते मंडळींचे आहेत. सहा महिन्यांपासून शेकडो शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची ऊसबिले थकीत आहेत. काही नेतेमंडळी शेतकऱ्याचे नाव घेऊन फुकट कळवळा दाखवितात. मग थकीत उसबीलासाठी का आवाज उठवीत नाहीत असा सवाल उस उत्पादक शेतकरी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu Genocide: बांगलादेशमध्ये हिंदू पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; हल्लेखोर पोलिस ठाण्यात घुसले अन्...

Shrikant Deshpande: ज्येष्ठ नागरिक रिकामे असतात, त्यांना प्रचारासाठी घ्या: माजी आमदार श्रीकांत देशपांडे; वादग्रस्त विधान चर्चेत!

Latest Marathi News Live Update : बिनविरोध निवडीबाबत अहवाल सादर करा - राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

Bhandara News: थरारक घटना! चालकाचे नियंत्रण सुटलं अन कार थेट तलावात कोसळली; पाेलिसांनी जीव धाेक्यात घालून वाचवले दोघांचे प्राण..

India Hydrogen Train : मोठी बातमी! देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या लाँचिंगचा मुहूर्त आला समोर

SCROLL FOR NEXT