Dhiraj Deshmukh Dhiraj Deshmukh
मराठवाडा

Dhiraj Deshmukh : आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे बंधू तथा लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लातूर : राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचे बंधू तथा लातूर (Latur) ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची कोरोना (Corona) चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. याबाबत स्वतः देशमुख यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ट्विटमध्ये धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) म्हणतात, की माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून डाॅक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. (Latur Rural MLA Dhiraj Deshmukh Tested Corona Positive)

गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पकंजा मुंडे आदींना कोरोना झाला आहे. हे सर्व उपचार घेत आहेत. राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्राॅनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे मुंबई व ठाणे येथील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरी विवाह सोहळे पार पडले. सोहळ्याला हजेरी लावणाऱ्यांनाही कोरोना झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT