सेलू (जि.परभणी) तालुक्यातील निम्न दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळ
मराठवाडा

हिंगोलीत ६.५० मिलिमीटर पाऊस, 'दुधना'तून पाण्याचा विसर्ग

राजेश दारव्हेकर, विलास शिंदे

हिंगोली/सेलू : जिल्ह्यात (Rain In Hingoli) मागील चोवीस तासांत शुक्रवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही. दुपारी बारापर्यंत पावसाचा हलका शिडकावा सुरू होता. त्यानंतर पाऊस थांबला होता. जिल्ह्यात (Hingoli) मागील चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस मिलिमीटर असा; हिंगोली- २.९०, कळमनुरी ६.७०, वसमत १३.३०, औंढा ५.३० तर सेनगाव (Sengaon) तालुक्यात ३.४०. जिल्ह्यात मंडळनिहाय झालेला पाऊस हिंगोली मंडळात ४.५० मिलिमीटर, नर्सी नामदेव १.५० मिलिमीटर, सिरसम २.३०, बासंबा ४.५०, डिग्रस ४.०, माळहिवरा १.५०, खांबाळा १.८० एकुण २.९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. (light showers in hingoli distric, water discharge from dhudana dam in selu glp88)

कळमनुरी (Kalamnuri) मंडळात ४. ३० मिलिमीटर, वाकोडी ३. ३०, नांदापुर १.८०, बाळापुर ६.०, डोंगरकडा १२. ८०, वारंगा ३.० एकुण ६. ७० मिलिमीटर पाऊस झाला. वसमत म़ंडळात १.९० मिलिमीटर, आंबा १५.८०, हयातनगर ११, गिरगाव १२.५०, हट्टा ६.८०, टेंभुर्णी ११.५०, कुरुंदा १६.५०, एकुण १३ ३० मिलिमीटर पाऊस झाला. औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंडळात ५.५० मिलिमीटर, ४.५०, साळणा ४.५०, जवळा ६.८० एकुण ५.३० मिलिमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात ९.५०, गोरेगाव ०.८०, आजेगाव ४.५०, साखरा शुन्य, पानकनेरगाव ३.०, हत्ता २.३० तर एकुण ३ ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यदर्शन झाले नाही.

निम्न दूधना प्रकल्प धरणाची शंभरीकडे वाटचाल

सेलू (जि.परभणी) (Parbhani) तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी होत आहे. मागील दहा वर्षांत निम्न दूधना प्रकल्प धरणाने (Lower Dhudana Dam) तीन वेळा पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर यावर्षी जुलै महिन्यातच धरण शंभरीकडे वाटचाल करताना दिसत आहे. सेलू तालुक्यात लोअर दुधना प्रकल्प असला तरी धरणाचे वितरिका, लघुवितरिकांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे केवळ धरणाच्या दोन्ही कालवा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनाच पाणी मिळते. त्यामुळे तालुक्याच्या (Selu) अर्ध्या भागात कुठलीच सिंचनाची सोय नाही. पावसावरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. तालुक्यातील शेतकऱ्यांची खरिपातील कापूस आणि सोयाबीन या मुख्य पिकांवर आर्थिक मदार आहे. यंदाही पावसाचा असमतोल दिसून येत आहे.

काही भागात कमी तर काही भागात अधिक पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात ५५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. त्यानंतर सोयाबीनचे आहे. कापसाच्या उत्पादनावर बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल अवलंबून असते. तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८००.३७ मिलिमीटर एवढी आहे. मागील दहा वर्षांत २०१३ आणि २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली होती. सर्वात कमी पाऊस वर्ष २०१४ मध्ये झाला होता. यंदा काही गावांमध्ये अतिवृष्टी होत असल्याने शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Office Vandalised : नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यालयाची तोडफोड; उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक; पाहा VIDEO

एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात रणवीर सिंग आणि रणबीर कपूर? बॉलिवूड अभिनेत्यानेच उघड केला आकडा

Viral Video: "अभिषेक आता माझा, तू त्याला बाबू का म्हणतेस?"; दोन तरुणींमध्ये तुफान राडा, केस पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Sangli Election : महाविकास आघाडीच्या पटावर रोज नवा डाव; शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय खलबते

Raigad Fort Traffic Issue : रायगड किल्ल्याला वाहतूक कोंडीचा विळखा, पर्यटक व स्थानिक त्रस्त

SCROLL FOR NEXT