मांजरा धरण.jpg 
मराठवाडा

सगळीकडे ओव्हरफ्लो ; 'मांजरा' ने मात्र आत्ताशी गाठली पन्नाशी ! 

हरी तुगावकर

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मांजरा धरण पावसाळा संपत आलेला असताना शुक्रवारी (ता. २५) पन्नास टक्के भरले आहे.

या धरणात ११२ दशलक्षघनमीटर एकूण पाणीसाठा झाला असून ता. एक जूनपासून ते शुक्रवारपर्यंत (ता. २५) धरणात १०५.४४ दशलक्षघनमीटर पाण्याची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरण पन्नास टक्के भरल्याने लातूर शहराचा काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यातील इतर सर्व धरणे ओव्हरफ्लो होत आहेत. मांजरा धरण मात्र आता पन्नास टक्के भरले आहे.


मराठवाड्यातील सर्व लहान मोठे धरणे भरून ओव्हरफ्लो होत आहेत. पण लातूरची परिस्थिती मात्र या पेक्षा वेगळी आहे. जिल्ह्यात मोठे पाऊस न झाल्याने मध्यम तसेच लघु प्रकल्पातही अद्यापपर्यंत समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. काही प्रकल्प तर अद्यापही कोरड्या अवस्थेत आहेत.  त्यात लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यासाठी धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरण महत्वाचे आहे. या धरणात गेल्या वर्षी पाणीच आले नव्हते. त्यामुळे लातूरला वर्षभर मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला गेला.

दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत होता. यावर्षी देखील धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरवातीला पाऊस झाला नाही. त्यानंतर या पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरुपाचे पाऊस होत गेल.त्यात सातत्यही राहिले. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यात गेल्या काही दिवसात तर पाणलोट क्षेत्रात पावसाची दररोज हजेरी आहे. त्यामुळे धऱणातील पाण्यासाठ्यात दिवसाला दोन तीन दशलक्षघनमीटरने वाढ होत आहे. लातूरकरांसाठी ही समाधानाची बाब असून एक ते दीड वर्ष पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

आकडेवारी

  • प्रकल्पीय पाणीसाठा--२२४.०९ दशलक्षघनमीटर
  • उपयुक्त पाणीसाठा--१७६.९६ दशलक्षघनमीटर
  • मृत पाणीसाठा--४७.१३ दशलक्षघनमीटर
  • पूर्ण संचय पातळी--६४२.३७ मीटर
  • सध्याचा एकूण पाणीसाठा--११२.०८ दशलक्षघनमीटर
  • सध्याचा उपयुक्त पाणीसाठा--६४.९५ दशलक्षघनमीटर
  • एकूण पाणीसाठ्याची टक्केवारी ---५०.०१
  • उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी--३६.७०
  • ता. एक जूनपासूनची धरणातील आवक--१०५.४४ दशलक्षघनमीटर

(संपादन-प्रताप अवचार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic : परतीच्या प्रवासात कोकणवासीयांची दमछाक; मुंबई-गोवा महामार्गावर भीषण कोंडी, रेल्वे गाड्याही रखडल्या

North India Floods : उत्तर भारतात पावसाचा हाहाकार ! काश्मीरचा देशाशी संपर्क तुटला, शिमल्यात १३०० रस्ते बंद

Latest Maharashtra News Updates : अथणीतील दरोडाप्रकरणी पाच जणांना अटक, सांगली जिल्ह्यातील तिघांचा समावेश

Asian Hockey Cup 2025 : 'सुपर फोर'च्या लढतीत भारताचा दणदणीत विजय; मलेशियाचा ४-१ ने पराभव...

Teacher's Day 2025: मुलांच्या डब्यासाठी बनवा चवदार पोहा-बटाटा टिक्की, शिक्षकदिन बनेल खास

SCROLL FOR NEXT