मराठवाडा

धनगर समाजाचा आरक्षणासाठी मुंबईत विधानभवनावर मोर्चा

सकाळवृत्तसेवा

नांदेड : राज्यातील धनगर समाजाला एस.टी. चे आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष सुरु आहे. परंतु, त्याकडे शासनकर्ते दुर्लक्ष करीत असल्याने, यशवंत सेनेतर्फे एक आॅगस्ट रोजी मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढत असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव नाईक यांनी सांगितले.

ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समाजाचा अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. आघाडी आणि युती सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीपुर्वी भारतीय जनता पक्षातर्फे धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन वर्ष झाली तरीही अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. परिणामी समाजाची सर्वच क्षेत्रांमध्ये अधोगती सुरु आहे. त्यासाठी झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी एक आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय यशवंत सेनेतर्फे घेण्यात आला.

यामध्ये मराठवाड्यातील धनगर समाजातील पुरुष व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही व्यंकटराव नाईक यांच्यासह प्रदेश सचिव रामराव बोडके, महादेव अर्जुन, प्रा. रघुनाथ पाटील, बाळासाहेब मोटे, मराठवाडा संपर्क प्रमुख नागोराव शेंडगे, मराठवाडा अध्यक्ष माधव देवकते, जिल्हाध्यक्ष बालासाहेब आचणे, माधव डोईफोडे आदींनी केले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT