latur news 
मराठवाडा

Corona Breaking : लातूरात कोरोना बाधितांवर आता घरीच मिळणार उपचार 

सुशांत सांगवे

लातूर : सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत; परंतु तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्याची परवानगी मिळू शकणार आहे.

पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच लातुरातही आता कोरोनाबाधितांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे; पण ही सुविधा कोरोनाबाधित सर्व रुग्णांसाठी नाही, तर लक्षणे नाही; पण अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाच मिळणार आहे. आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या निकषांत बसणाऱ्या रुग्णांनाच घरात राहून उपचार घेता येणार आहेत. 

लातुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या सध्या तीनशेच्या जवळपास पोचली आहे. त्यातील १९० रुग्ण आजवर बरे झाले आहेत, तर १६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांवर तातडीने आणि योग्य उपचार व्हावेत म्हणून शहरात आणि वेगवेगळ्या तालुक्यात यंत्रणा उभी करण्यात आली आहे. संशयित आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात आले होते; मात्र आता लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सध्या लातूर जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्ण घरी राहून उपचार घेत आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे म्हणाले, की आरोग्य मंत्रालय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला आणि कोरोनासंबंधातील इतर कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत; पण त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अशा रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले जाणार आहेत. घरात रुग्णांसाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र बाथरूम असावे. यासह सरकारने दिलेल्या अन्य निकषांत बसणाऱ्या रुग्णांनाच घरी राहून उपचार घेता येणार आहेत. घरी राहून उपचार घेणे हे ऐच्छिक असणार आहे. 

घरी राहून उपचार घेताना कुठलाही त्रास जाणवला, तर तातडीने डॉक्टरांना दूरध्वनी करून सल्ला घ्यावा, अशा सूचना आम्ही संबंधित रुग्णांना देत आहोत. त्यासाठी आवश्यक दूरध्वनी क्रमांक रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिले जात आहेत. शिवाय, डॉक्टरही दररोज संबंधित रुग्णांना दूरध्वनी करून रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

घरी राहून उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाने घरातील इतर व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवणे, चेहऱ्याला मास्क बांधणे, नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत स्वतंत्र खोलीत राहणे, दिलेली औषधे वेळेवर घेणे, डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे, वैद्यकीय पथकाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. याबाबतच्या सूचना संबंधित रुग्णांना देत आहोत. 
डॉ. संजय ढगे, जिल्हा शल्यचिकित्सक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jaykumar Gore: युती होणार, कोणीच रोखू शकत नाही; पालकमंत्री जयकुमार गोरे, युती रखडली का? यावर काय म्हणाले?

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

Kashmiri Pheran: लोकल ते ग्लोबल ओळख बनलेला काश्मिरी फेरन, वाचा कसा बनतो आणि काय आहे त्याची खासियत

Tigress Tara: कसणी परिसरात तारा वाघिणीचा फेरफटका; कॉलर रेडिओद्वारे देखरेख, एसटीसमोरूनच रस्ता ओलांडत हाेती अन्..

अयोध्येची राजकुमारी 2 हजार वर्षांपूर्वी कोरियाला गेली, तिथल्या राजाशी लग्न केलं; अयोध्येत भव्य पुतळ्याचं अनावरण

SCROLL FOR NEXT