one died after Car-two-wheeler accident at Hadgaon in Pathri taluka people burnt the car marathi news  
मराठवाडा

Accident News : पाथरी तालुक्यातील हादगाव शिवारात कार दुचाकीचा समोरासमोरधडक; एकाच्या मृत्यूनंतर अज्ञातानी जाळली कार

पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर हादगाव शिवारामध्ये रविवारी (ता.२) रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

सकाळ वृत्तसेवा

पाथरी : स्विफ्ट कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर स्विफ्ट मधील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास राज्य महामार्ग ६१ वर हदगाव शिवारात घडली. दरम्यान या दुर्घटनेनंतर अपघातग्रस्त कार अज्ञातांनी जाळून टाकली.

पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर हादगाव शिवारामध्ये रविवारी (ता.२) रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी स्विफ्ट कार क्रमांक (एमएच २० ईई २६५१) व पाथरीकडे जाणारी विना क्रमांक असणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील युवक महादेव भास्कर पवार वय ३२ रा . सागर कॉलनी पाथरी हा जागीच ठार झाला. यावेळी कारमध्ये दोन महिला व एक पुरुष प्रवास करत होते, अपघातात यामधील एक महिला गंभीर जखमी असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे .

दरम्यान अपघातात मयत झालेल्या युवकाचे पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सकाळी ९च्या सुमारास कार चालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे यावेळी त्यांचे म्हणणे होते. पोलीस निरीक्षक मोहीते यांनी आलेल्या नातेवाईकांशी चर्चा केली.

संध्याकाळी साडेसात वाजता अपघात झाल्यानंतर सदरील कार घटनास्थळी रस्त्याच्या बाजूला उभी होती. परंतु अपघाततील स्विफ्ट कार अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari : विमान अपघातावर मिटकरींचे गंभीर प्रश्न; सहा मृतदेहांपैकी एकाचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात

Railway recruitment: रेल्वेमध्ये तब्बल २० हजारांहून अधिक 'ग्रुप डी' पदांसाठी भरती सुरू ; इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

Pune Water News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ८ ते १० दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार; पाणीटंचाईची भीती

Sangli Hit And Run : गणपती पेठेत ‘हिट अँड रन’चा थरार, चार पोलिसांसह अकरा जखमी; नशेतधुंद कार चालकास जमावाने तुडवले

Rohit Shetty House Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारप्रकरणी पुण्यातून पाचजण ताब्यात, गॅंगस्टर बिश्नोई टोळीशी संबंधाचा संशय

SCROLL FOR NEXT