विनामास्क २५.jpg
विनामास्क २५.jpg 
मराठवाडा

उस्मानाबादेत बारा तासात ४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी ४०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच 165 नवीन रुग्णांना कोरोनाची लागन झाली असुन एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८ हजार ४२२ इतके कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दोन दिवसांपासुन वाढत असल्याचे दिसुन येत आहे. ७५ टक्के एवढे हे प्रमाण झाले असुन मृत्युदर २.९६ टक्क्यावर आला आहे. गूरुवारी तो तीन टक्क्यावर गेला होता. पण मृत्यू दराच्याबाबतीत मोठा फरक पडलेला दिसत नाही. आतापर्यंत ५५ हजार ११६ चाचण्यापैकी ११ हजार २१५ इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना होण्याचे प्रमाण पाहिले असता 20.35 टक्के नमुने पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसुन येत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये ८ हजार  एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०४९ इतके व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी १६५ रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ४६ जण आरटीपीसीआरद्वारे तर १०४ रुग्णांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर १२ रुग्ण इतर जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्येही उस्मानाबाद तालुक्यामध्ये सर्वाधिक ४७ रुग्ण सापडले असुन गेल्या काही दिवसापासुन उस्मानाबाद मध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यानंतर कळंबमध्ये २६, उमरगा २५ अशी रुग्णसंख्या आढळली आहे. वाशी १९, भुम १३ , परंडा १५, तुळजापुर 13 व लोहारा सात अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यातही आरटीपीसीआरद्वारे रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असुन अँटिजेन टेस्टची संख्या वाढली असुन जिल्ह्यामध्ये त्या टेस्टच्या माध्यमातुन पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे.  दिवसभरामध्ये ४०० रुग्ण बरे झाल्याची एक चांगली बाब आज पाहयला मिळाली असुन रुग्णसंख्या देखील गेल्या काही दिवसापेक्षा निश्चितपणे कमी झाली असुन मृत्युची संख्या देखील आज एक वर आल्याने किमान आजच्या पुरती तरी परिस्थिती आटोक्यात असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्यात आता एकुण रुग्णसंख्या ११ हजार २१५ इतकी झाली आहे. एकूण बरे झालेल्याची संख्या आठ हजार ४२२, उपचाराखाली असलेल्या रुग्णसंख्या दोन हजार ४६१ इतकी आहे. जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ३३२ इतकी झाली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT