corona photo.jpg
corona photo.jpg 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६६ गावांनी कोरोनाला हरविले 

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तब्बल १६६ गावांत कोरोना पोचू शकलेला नाही. गावाच्या एकजुटीच्या जोरावर गावकऱ्यांनी कोरोनाला ‘नो एन्ट्री’ केल्याने ग्रामस्थ सुरक्षित राहिले आहेत. कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम पाळले गेल्याने १६६ गावांतील नागरिकांनी कोरोनाला प्रवेश दिला नाही, अशी भावना प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र, धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, सहा-सात महिन्यांपासून कोरोनाने जिल्ह्यासह राज्यात धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यात रोज शेकडो नवीन रुग्णांची वाढ होत असे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या जात होत्या. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी लाकडाउनसह, रेल्वे, एसटी बससेवा अशा अन्य अनेक आस्थापना बंद कराव्या लागल्या. परिणामी, कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ग्रामीण पातळीवरही मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आली होती. बाहेरच्या गावाहून आल्यानंतर संबंधिताला शाळेत, सभागृहात क्वारंटाइन केले जात होते. तर कोरोनाची लागण झालेल्यांना गावात प्रवेश दिला जात नव्हता. गावात एकही रुग्ण वाढू नये, यासाठी सर्वच प्रकारे प्रयत्न केले जात होते. 

भूम तालुक्यातील सर्वाधिक गावे 
जिल्ह्यातील १६६ गावांत कोरोना प्रवेश करू शकला नाही. लोहारा तालुक्यातील ४७ पैकी केवळ सातच गावांच्या सीमेवर कोरोनाला रोखण्यात यश आले. उस्मानाबाद तालुक्यातील ११० पैकी २१, परंडा तालुक्यातील ९६ पैकी १७, वाशीच्या ५४ पैकी ९, तुळजापूरच्या १२८ पैकी ३४, उमरगा ११४ पैकी ३०, कळंबच्या ९५ पैकी १८ गावात कोरोना जाऊ शकला नाही. दरम्यान भूम तालुक्यातील ६३ पैकी तब्बल ३० गावांनी कोरोनाला गावात प्रवेश बंदी करून रोखल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान आहे. 

गावातील नागरिकांमध्ये एकजूट असेल तर नेहमीच चांगली कामे होतात. जिल्ह्यात १६६ गावांनी कोरोनाला रोखले आहे. हे या गावांचे वेगळेपण आहे. जरी कोरोनाची दहशत असली तरी गावाच्या ऐकीपुढे मोठे संकटही हार मानते. 
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, उस्मानाबाद.

(Edited By Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT