file photo 
मराठवाडा

उस्मानाबादः नगरपालिका, नगरपंचायतींच्या जागांचे निकाल जाहीर

तानाजी जाधव

उस्मानाबाद: जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिकेच्या चार व नगरपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा आज (बुधवार) निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस, भाजप व शिवसेना यांच्या आघाडीचे चारही उमेदवार विजय झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही तसेच त्यांची मते फोडण्यातही विरोधकांना यश आल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा परिषदतून निवडून द्यायच्या १९ जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे १०, काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी चार तर भाजपला एक जागा मिळाली आहे.

अटीतटीच्या नागरिकांच्या मागासप्रवर्ग (महिला) जागेसाठी समान मते पडल्याने टॉस करावा लागला. तेथेही राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागला. नगरपंचायतीच्या एका जागेसाठी काँग्रेस व शिवसेनेने एकमेकांच्या उमेदवार दिले होते. तेथे काँग्रेस उमेदवाराने सेनेच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने विजय मिळविला. पक्षीय पातळीवरील समीकरणं बदलुन टाकणारी ही निवडणुक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरु झाली आहे.

राष्ट्रवादी विरुध्द सर्वपक्षीय असा थेट सामना नगरपालिकेच्या चार जागेसाठी होता. १७४ मतदारापैकी १७२ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर विरुध्द राष्ट्रवादीकडून श्रीधर भवर अशी थेट लढत होती. त्यात श्री. राजेनिंबाळकर याना १०८ तर श्री.भवर याना ६४ मते पडली. सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भाजपकडून संयोगिता गाढवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या चंद्रप्रभा जाधव या रिंगणात होत्या. त्यात श्रीमती गाढवे यांना तब्बल ११३  तर श्रीमती जाधव याना ६१ मते पडली. अनुसुचित जातीच्या प्रवर्गातून काँग्रेसकडून सिध्दार्थ बनसोडे तर राष्ट्रवादीकडून माणिक बनसोडे यांची लढत होती. त्यामध्ये सिध्दार्थ बनसोडे यांना १०० तर माणिक बनसोडे यांना ७२ मते पडली. नागरीकांचा मागासप्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी चुरशीची लढत पाहयला मिळाली. काँग्रेसकडून मुरुमच्या नगरसेविका अनिता अंबर तर राष्ट्रवादीकडून तुळजापुरच्या नगरसेविका अश्विनी रोचकरी यांच्यामध्ये लढत झाली. दोन्हीही उमेदवाराना प्रत्येकी 86 मते पडल्याने टॉस करावा लागला. तिथेही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला.

राष्ट्रवादीच्या संख्याबळाचा विचार केला तर त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे ७२ मते होती. तरीही त्यांच्याकडील दोन उमेदवारांना मतदान करताना पक्षातील काही नगरसेवकांनी विरोधी गटाला मदत केल्याचे दिसून आले. तर काँग्रेसच्या उमेदवारांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील मते फोडण्यात अपयश आल्याचे दिसून आले मात्र सेना व भाजपच्या उमेदवारांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पडद्याआडून मदत केल्याने हे नगरसेवक कोण याची चर्चा सध्या तरी राष्ट्रवादीच्या गोटात सूरु आहे. नगरपंचायतीच्या एका जागेसाठी सर्वसाधारण गटातून वाशी येथील काँग्रेसचे नगरसेवक प्रसाद जोशी यांच्याविरोधात सेनेकडून लोहारा येथील नगरसेवक अबुलवफा अबुलफताह कादरी यांच्यात चुरशीची लढत झाली. ३४ मतापैकी एक मत बाद झाल्याने ३३ मतदान झाले. त्यामध्ये श्री. जोशी यांना १७ तर कादरी यांना १६ मते पडली. त्यामुळे श्री. जोशी यांचा एका मताने विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Love Story : शूटिंगदरम्यान झाली मैत्री, दहा वर्षांचं डेटिंग आणि लग्न; रितेश-जिनिलियाची भन्नाट गोष्ट

Power Supply: कल्याणमध्ये विजेचा खेळखंडोबा, महावितरणावर ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : जळगावात सरकारी कामात अडथळा; कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव

Katraj Zoo : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १६ हरणांचा मृत्यू; वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण; तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत

SCROLL FOR NEXT