सारिका काळे.jpg
सारिका काळे.jpg 
मराठवाडा

मराठवाड्यासाठी गौरवास्पद : उस्मानाबादच्या सारिका काळेला 'अर्जुन पुरस्कार' जाहीर

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार पटकाविणारी सारिका ही मराठवाड्यातील पहिली महिला क्रीडापटू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उंबरे कोटा या गावातील राहणारी अत्यंत सामान्य घरातील मुलीने आज पुन्हा जिल्ह्याच्या गौरवात पाडली आहे. २९ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे सन्मानित केले जाणार आहे. 

सारिकाचा थक्क करणारा प्रवास 
सारिका काळे हिची घरची परिस्थिती सुरुवातीपासूनच हालाखीची. वडील अपंग, आई व आजी यांच्या अथक परिश्रमाने सारिका घडली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल उस्मानाबाद, पदवीचे शिक्षण तेरणा महाविद्यालय उस्मानाबाद, तर पदव्युत्तर शिक्षण कला, वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथे पुर्ण केले. 

पाचवीत असताना अर्थात वयाच्या अकराव्या वर्षी तिने मैदानावर पहिले पाऊल टाकले. ते अगदी देशाच्या खो-खो संघाची कर्णधार होईपर्यंत तिने मागे पाहिलेच नाही. अर्थात हा प्रवास सर्वांना थक्क करणारा आहे. श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये खो-खो खेळ खेळतच आपल्या खेळाचा ठसा उमटविला. २००६-२००७ मध्ये महाराष्ट्र संघात निवड झाली. आपल्या अथक परिश्रमाने सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळली. या सांघिक खेळामध्ये १२ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कांस्य पदके मिळवून दिली. 

सन २०१०-११ ला सारिकाची प्रथमच महाराष्ट्राच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. छत्तीसगढमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळाले. नंतर तिने तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कर्णधारपद भूषविले. २०१५-१६ मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली. तिच्या नेतृत्वाखाली भारतास सुवर्णपदक मिळाले आहे. सन २०१६ मध्ये आसाम गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही सुवर्णपदक पटकाविले.

सारीका सारख्या अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलीने महाराष्ट्र खो-खो संघाच्या कर्णधारपदी चार वेळा,  देशाच्या खो-खो संघाच्या कर्णधारपदी राहून सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खो-खो संघाची सदस्य व तिसऱ्या आशियायी क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमानही तिने प्राप्त केला आहे. राज्यशासनाचे सर्व पुरस्कार तिला प्राप्त झाले आहेत. शासनाने तिचा गौरव करीत तालुका क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती केली. सारिका तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. 

पोर सुकून गेली..! तुम्हीच काहीतरी करा...
दक्षिण आशियाई क्रीडास्पध्रेसाठी संघनिवडीकरता सोलापूरला सामने होणार होते. घरातील नेहमीचा विरोध टोकाला गेला. असं असूनही तत्पूर्वी सारिका तब्बल २२ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाली होती. पण यावेळी मात्र घरातून विरोध आणखीनच वाढलेला होता. शेवटी सारिकाने स्वत:ला घरात कोंडून घेतलं. सगळ्यांशी संपर्क तोडला. आपला खेळ सुटला याचे दु:ख कवटाळत ती घरी बसली. तिच्या आजीचा जीव मात्र कासावीस होत होता. तिनं कुठूनतरी सारिकाचे प्रशिक्षक प्रा. चंद्रजीत जाधव यांचा फोन नंबर मिळवला. त्यांना विनंती केली. 

म्हणाल्या, ‘पोर सुकून गेली आहे. तुम्हीच काहीतरी करा.’ चंद्रजीत जाधवांनी सारिकाचं घर गाठलं. सारिका त्यांना म्हणाली, ‘मला यावेळी जमणार नाही, सर!’ चंद्रजीत जाधव यांना तिच्या घरातल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्यांनी शांतपणे विचारले, ‘पैसे नाहीत का? वडिलांना सांगायचं आहे का?’ त्यांच्या त्या प्रश्नांनी सारिकाच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
शेवटी चंद्रजीत जाधव यांनी तिचे काका प्रभाकर काळेंना नेहमीप्रमाणे गाठलं. प्रभाकर काळेही खो-खो खेळाडू. दोघांनी तिच्या वडिलांना समजावलं. पैशाची काळजी करू नका म्हणाले. ‘एवढा वेळ येऊ द्या बरोबर,’ असं सांगत वडिलांना त्यांनी पटवलं. तेव्हा कुठे सारिका सोलापूरला निवड समितीसमोर खेळली. तिची खो-खोमधील चपळाई पाहून निवड समितीने तिच्याकडे राज्य खो-खो संघाचं कर्णधारपद दिले. 

काय आहे अर्जुन पुरस्कार..! 
राष्टीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरु केला आहे. तीन लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेला छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT