Osmanabad News 
मराठवाडा

पवन राजे निंबाळकर हत्या प्रकरणाला वेगळे वळण

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : कॉंग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर, त्यांचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी पारसमल जैन याचा माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज मंजूर केला आहे. 

चार डिसेंबरला विशेष सीबीआय न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार करण्याबाबतचा अर्ज दिला होता. त्यावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सुनावणी होऊन शनिवारी (ता. 21) पारसमल जैन यास माफीचा साक्षीदार करण्याचा अर्ज मंजूर करण्याचा आदेश दिला आहे. पवन राजेनिंबाळकर हे तीन जून 2006 रोजी मुंबईहून कारने येत असताना कळंबोली येथे गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांचे वाहनचालक समद काझी हेदेखील या हल्ल्यात ठार झाले होते.

पारसमल जैन माफीचा साक्षीदार

पारसमल जैन याचा माफीचा साक्षीदार होण्याबाबतचा अर्ज सत्य घटना सांगण्याच्या अटीवर न्यायालयाने मंजूर केला आहे. मागील तेरा वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्या दुहेरी खूनखटल्याला आता निर्णायक वळण मिळाले आहे. हत्येचा रचलेला कट, तसेच प्रत्यक्ष हत्येच्या वेळी सहभागी असणारे शूटर, त्यांनी वापरलेली शस्त्रे, आरोपींनी वापरलेले वाहन, हत्येमागचा हेतू आदी घटनाक्रम पुन्हा एकदा न्यायालयासमोर येण्याची शक्‍यता आहे.

या प्रकरणात एकूण नऊजणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. यात पारसमल जैन, दिनेश तिवारी व पिंटू सिंग हे अद्यापही कारागृहात असून इतर सहाजण जामिनावर सुटले आहेत. पवन राजेनिंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी हा खटला सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. सीबीआयने केलेल्या तपासानंतर या खटल्यात न्यायालयाने आतापर्यंत 127 जणांची साक्ष घेतली आहे. माफीचा साक्षीदार म्हणून आता जैन हा 128 वा साक्षीदार ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT