jalkot gram panchayat election 
मराठवाडा

मला एकदा संधी द्या म्हणत प्रचाराची रणधुमाळी!

विवेक पोतदार

जळकोट (जि.लातूर) :  तालुक्यात २७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून अनेक नेत्यांच्या गावातही निवडणूका होत आहेत. गावागावातून रस्ते,चौक गजबजलेले असून प्रचाराने वेग घेतला असून एकदा मला संधी द्या अन बघा गावाचा विकास कसा करतो ते.....असा गळ मतदारांना घालण्याचा प्रयत्न उमेदवाराकडून केला जात असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील सोनवळा, बेळसांगवी,अतनूर ,रावणकोळा, कुणकी, लाळी बुद्रुक, बोरगाव , एकूका , तिरुका, घोणसी , चिंचोली , मेवापूर, धामनगाव , शेलदरा , विराळ , वडगाव , वांजरवाडा, शिवाजीनगर तांडा सुल्हाळी, डोंगरगाव , येलदरा, गव्हाण , हाळद वाढवणा ,मरसांगवी , पाटोदा खुर्द, कोळनूर ,डोंगरकोनाळी , या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

चिन्ह वाटपानंतर आता ग्रामीण भागात प्रचाराला सुरवात झाली असून पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी तर वांजरवाडा सारख्या मोठ्या गावात चौरंगी सामना होत असल्याने उत्सुकता वाढली आहे. पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी मतदारांना कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून उभा आहे? याची खात्री करुन घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. आम्हीच कसा गावाचा थांबलेला विकास करु शकतो पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 

काही गावात जुन्यासह नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. तरूणांचा अनेक गावात उत्साह असल्याचे चित्र आहे.  सध्या गावासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदि विषय निवडणुकीत ऐरणीवर आले असून गावविकासाच्या गप्पांना वेग आला आहे.

ग्रामीण भागात सध्या विविध शेतीकामे सुरु असून त्यासाठी सकाळी व रात्री कार्यकर्ते गल्लीबोळातून, घरोघरी फिरुन निवडणूकीनंतर आम्ही काय करणार आहोत? याचा पाढा वाचत आहेत. मतदार मात्र चाणाक्षपणे मतदान तुम्हालाच...असे सांगून उमेदचारांचा उत्साह वाढवत आहेत.गावातील मुख्य रस्ते,चौक,चावड्या गजबजत असून हाॅटेलवर चहापाणी मागवले जात आहे.

या निवडणूकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत असल्यामुळे खरी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पंचायत समिती सभापती बालाजी ताकबीडे यांच्या वांजरवाडा गावात चौरंगी सामना रंगणार आहे. तसेच विविध पक्षाच्या प्रमुखांच्या गावातही निवडणूक होत आहे.

 काहीजण स्वतः रिंगणात नसले तरी रिमोटकंट्रोल हातात ठेवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे चित्र आहे. चिन्ह वाटप झाल्यामुळे उमेदवार व कार्यकर्ते प्रचार कामाला लागले आहेत. तालुक्यात तिरुका ग्रामपंचायत मात्र बिनविरोध काढून ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

प्रशासकीय पातळीवर मतदानाची तयारी सुरु असून प्रशासन उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार्श्वभूमीवर  सज्ज असल्याचे तहसीलदार संदीप कुलकर्णी,नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांनी दै.सकाळशी बोलताना सांगितले.

आता पुण्या-मुंबईच्या मित्रांची आठवण-

कोरोना काळात लाॅकडाऊनमध्ये गावागावातून पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणाहून कोण आले यावर अनेकांच्या नजरा होत्या. त्यांना कसे टाळता येईल, काॅरंटाईन करावे यासाठी अनेक ठिकाणी वाद झाले परंतु  आता मात्र आपले पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आता त्यांना मतदानासाठी  गावात कसे आणता येईल. त्यांचा शोध घेऊन नियोजन करण्यात अनेकजण मग्न असल्याचे चित्र आहे.

मतदान बुथची निवडणूक निरीक्षकांनी केली पाहणी-

तालुक्यात काही मतदान बुथची निवडणूक निरिक्षकांनी मंगळवारी (ता.५) भेट देऊन पाहणी केली. मरसांंगवी, अतनुर, हळद वाढवणा, वांजरवाडा आदि संवेदनशील मतदान केंद्रावर निवडणूक निरीक्षक अनंतराव कुंभार यांच्यासह सहाय्यक हणमंत गादगे, तलाठी विश्वास धुप्पे, श्री शेख आदि उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT