संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र. 
मराठवाडा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागात पदभरती

महेश गायकवाड

जालना - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध मनुष्यबळाची कमतरता जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संवर्गातील २८९ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरती करण्यात येत आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली पात्र उमेदवारांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषद स्‍तरावरील पदभरतीच्या १५३ जागांसाठी तब्बल ७७८ जणांचे अर्ज आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ झाली. 

भरती प्रक्रिया ता.३१ मार्च ते ता.४ एप्रिल दरम्यान पार पडली. आरेाग्य सेवक, डेटा एंट्री ऑपरेटर (लेखापाल), आरोग्य सेविका, औषध निर्माता या पदांची भरती प्रक्रिया जिल्हा परिषद स्‍तरावर पार पडली. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची व स्‍टाफ नर्सची पदे जिल्हा सामान्य रुग्णालय स्‍तरावर भरण्यात आली.

आरोग्य सेवकांच्या १२२ जागांसाठी ९१ तर आरोग्य सेविकांच्या १६ जागांसाठी तब्बल ३४५ अर्ज प्राप्त झाले होते. औषध निर्माता पदाच्या १२ जागा रिक्त होत्या, त्यासाठी २६७ जणांचे अर्ज आले. तर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या ३ जागेसाठी ७६ अर्ज प्राप्त झाले होते.

भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार होती. मात्र, गर्दी टाळण्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्‍थळावर रविवारी (ता.पाच)प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय स्‍तरावर ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण ४७ पदे भरण्यात आली आहे. तसेच आरोग्य सहायिकांच्या १३ पदांपैकी तीन तर आरोग्य साहाय्यकांच्या ९ पैकी ३ जागा भरण्यात आल्या आहे. 

निवड झालेल्यांनी तातडीने रुजू होण्याचे आदेश 

दरम्यान सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय स्‍तरावर निवड झालेल्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदस्‍तरवर झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची यादीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीतील नावाबरोबर रुजू होण्याचे पत्रही संकेतस्‍थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून ते डाऊनलोड करून संबंधित रूग्णालयात जाऊन उमेदवारांनी कार्यरत व्हावे. निवड झालेल्यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT