Aundha Nagnath Nagar Panchayat And Shiv Sena  esakal
मराठवाडा

औंढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे खंदारे, उपनगराध्यक्षपदी देशमुख

औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजू ऊर्फ कपिल खंदारे, तर उपनगराध्यक्षपदी सेनेचे साहेबराव देशमुख (काळे) यांची गुरुवारी (ता.१७) बिनविरोध निवड झाली. नगरपंचायतमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. नगरपंचायतच्या १७ पैकी ९ जागा शिवसेना, तर काँग्रेस चार, भाजप दोन, वंचित आघाडी दोन असे पक्षीय बलाबल आहे. औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणुकीत (Aundha Nagnath Nagar Panchayat Election) १७ पैकी ९ जागांवर शिवसेनेने झेंडा फडकविला आहे. त्यांना बहुमतासाठी ९ सदस्यांची आवश्यकता होती. पुढे नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात ८ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. त्या दिवशी शिवसेनेकडून राजु खंदारे यांचा एकमेव अर्ज आला होता. (Shiv Sena In Power In Aundha Nagar Panchayat, Kapil Khandare Elected As City President)

केवळ औपचारिकताच बाकी राहणार होती. परंतु नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांच्या निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा बोलावली होती. सभेला शिवसेनेचे (Shiv Sena) तालुकाप्रमुख तथा नगरसेवक साहेबराव काळे, नगरसेविका जया देशमुख, नगरसेवक अनंत देव, नगरसेविका सपना कनकुटे, नगरसेवक राजू खंदारे, नगरसेवक राहुल दंतवार, नगरसेवक दिलीपकुमार राठोड, नगरसेवक मनोज देशमुख, नगरसेविका शीतल पवार सर्व शिवसेना ९, तर दोन भाजप नगरसेविका दीपाली पाटील, नगरसेविका अश्विनी पाटील, काँग्रेसचे (Congress Party) नगरसेविका कुंताबाई गोबाडे, सुनिता जावळे मोहमद आसेफ इनामदार, शेख गजाला बेगम शेखअजिज तर वंचित बहुजन आघाडीचे शेख गोरीबी रशीद, नगरसेविका रेश्मा मोहम्मद शफी यांची उपस्थिती होती. निवड सभेत उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून साहेबराव देशमुख यांचा एक मात्र अर्ज आला. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जयस्वाल यांनी नगराध्यक्षपदी राजू ऊर्फ कपिल खंदारे व उपनगराध्यक्षपदी साहेबराव देशमुख या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. (Hingoli Updates)

यानंतर औंढा शहरातून विविध भागात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार संतोष बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, समाजकल्याण सभापती फकीरा मुंडे, माजी उपसभापती अनिल देशमुख , प्रदीप कनकुटे, उत्तमराव देशमुख, विष्णू पवार, गणेश देशमुख , श्रीराम राठी, महादेव गोरे, लल्ला देव, अभिषेक गोरे, नागनाथ रेणके, वैभव इखे, तुळशीराम जाधव, विष्णू जाधव, भगवान सोनुने , प्रशांत पायघन ,बाळू तेली, सुंदर देशमुख, सचिन राठोड, रवी पवार, अनिल शिंदे, सुनिल खंडागळे, गणेश कुरवाडे, सुंदर देशमुख, दीपक सोनुने, साई गोरे, रावसाहेब देशमुख , कृष्णा देव यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT