Jalyukta_Shivar_3.jpg 
मराठवाडा

परळी जलयुक्त शिवार योजनेचा घोळ : कृषी अधिकाऱ्यांसह सहा जणांवर होणार गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत परळी तालुक्यातील अनेक कामे झाली नसल्याचे आणि अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. भताने यांच्यासह सहा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परळी तालुक्यातील बोगस कामांची पाहणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील दक्षता पथकाने ही पाहणी केल्यानंतर कामे न झाल्याने अनेक अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस दिली होती. यानंतर विभागीय कृषी सहसंचालकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे कळविले आहे. 

त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी परळीचे तालुका कृषी अधिकारी ए. ए. सोनवणे यांना याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत केले आहे व तसे आदेश दिलेले आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. एस. भताने, अंबाजोगाईचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ, परळीचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी बी. बी. बांगर, कृषी सहायक एस. एस. गव्हाणे, एस. एस. जायभाये आणि श्रीमती के. एन. लिमकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : आईने २ वर्षांच्या लेकीला गळा आवळून संपवलं, स्वत:ही टोकाचं पाऊल उचललं; धक्कादायक कारण समोर

CM Yogi Adityanath : योगींच्या नेतृत्वाचा चमत्कार! नववर्षाला 30 लाख तरुणांनी गाठली काशी

Latest Marathi News Live Update: सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल

Kolhapur Friend Killed : शिवी का दिलीस कारणावरून जीवलग मित्राच्या डोक्यात दगड घातला अन्..., दारूने केला शेवट

Single Mother Childrens : एकल मातांची दोन लाख मुले शिक्षणात; नाशिक, जळगाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT