corona.jpg
corona.jpg 
मराठवाडा

कोरोनामुळे अबंड शहरात दोन व्यापारी संघटनात जुंपली !

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबडमध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने शहरात शनिवारी (१२) बैठक घेऊन सलग चार दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे नवीन व्यापारी महासंघाने संघाने सोशल मीडियावरून बाजारपेठ सुरू राहणार असल्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अंबड शहरात व्यापार्यांबरोबरच नागरिकांमध्ये सध्या चलबिचल झाली आहे. बाजारपेठ नेमकी सुरु राहणार की बंद हे कळण्या मार्ग नाही. 

अंबड शहरातील सर्व लहान व मोठे व्यापारी बंधूंना कळविण्यात येते की, अंबड शहर व तालुक्यात विशेष करून अंबड शहराशी संपर्कात असलेली ग्रामीण भागातील गावे वाढती कोरोना पेशंट संख्या लक्षात घेता व्यापारी पेठेत धोका निर्माण झाला असून काही व्यापारी व त्यांचे परिवार कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. याचा सारासार विचार करता आज व्यापारी महासंघाची एक बैठक संपन्न झाली. त्यात शहरातील सर्व व्यवसायिक संघटना अध्यक्ष हजर होते. बैठकीत अंबड शहरातील व्यापारी बाजार पेठ बुधवार (ता.१६) ते रविवार (ता.२०) या दिवसापर्यंत बंद ठेवावे. यावर एकमत झाले. 

कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्या पासून व्यापारी बांधवांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. यात शंकाच नाही. परंतु आजची परिस्थिती बघता आपला जीव वाचवणे खूप महत्वाचे आहे. शेवटी आपला जीव महत्वाचा आहे. हाच शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून हा कठीण निर्णय घ्यावा लागत आहे. त्यास शहरातील सर्व लहान मोठ्या सर्व व्यापारी बांधवानी पाठींबा द्यावा असे विनम्र आवाहन व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले.

शनिवारी झालेल्या बैठकीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव, सचिव गणेश बोरडे,अशोक बियाणी, अतुल मालू, जगन्नाथ चौधरी, पांडुरंग जामदरे, आंबदास अंभोरे, शिवाजी बजाज, सुनील मोटवानी, रमेश शहाणे, एकनाथ घायाळ,अरुण भवर,संजय जोशी,ओमप्रकाश उबाळे, विशाल गिलडा, महेंद्र संगेवार, राजेंद्र पटवारी, भीमराव शिंगाडे नाना, अजीज बेग, शिवप्रसाद चांडक, हे व्यापारी प्रतिनीधी उपस्थित होते.

नवीन व्यापारी महासंघ म्हणते बाजारपेठ सुरुच. 

नवीन व्यापारी महासंघाच्या वतीने बाजारपेठ बंद राहणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरक्षितता व स्वछता अंगी बाळगत दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन अध्यक्ष गोवर्धन भोरे, सचिव समदभाई बागवान यांनी सोशल मीडियावरून केले आहे. यामुळे व्यापारी व नागरिक सध्या संभ्रमात पडले आहे. यामुळे अंबड शहर व परिसरात चलबीचल सुरू आहे.

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT