st 22.jpg
st 22.jpg 
मराठवाडा

लालपरी सुसाट; उमरगा आगाराला ९० लाखांचे उत्पन्न !

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : एस. टी. महामंडळाने आंतरजिल्हा  बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर २० ऑगस्टपासुन २० सप्टेंबरपर्यंत एक महिन्यात ९० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. मंध्यतरीच्या बंद काळाच्या साडेचार महिन्यानंतर पहिल्यांदाच इतके उत्पन्न मिळाले असून आगाराने पूणे, बोरिवली, औरंगाबाद फेऱ्या सुरू केल्या आहेत. दरम्यान उमरगा आगाराचे उत्पन्न जिल्ह्यातील इतर आगाराच्या तुलनेत अव्वल आहे.

लॉकडाउनमुळे बस वहातूक पूर्णतः विस्कळीत होती. कोट्यावधी रुपयाचा आर्थिक फटका एस.टी. महामंडळाला बसला. मंध्यतरी जिल्हा अंतर्गत बस सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त पाचशे रुपयाचे आर्थिक उत्पन मिळाले होते. आठ जूनच्या २१ बसफेऱ्यातून केवळ अकरा हजार ८७६ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. मालवाहू बसलाही फारसा  प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर २० ऑगस्टपासून लातूर, सोलापूर, अक्कलकोट, उस्मानाबाद, कंटेकूर दोन, डिग्गी, निलंगा, दाळींब,  माकणी या मार्गावर बसफेऱ्या सुरु केल्या. त्यानंतर हळूहळू प्रवाशांचा ओढा बसने प्रवास करण्याकडे सुरू झाल्याने फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. एक महिन्याच्या काळात तीन लाख ७२ हजार ८१० किलोमीटर अंतरातून जवळपास चार हजार १५० बस फेऱ्या झाल्या. त्यात जवळपास एक लाख ३८ हजार ९१७०  प्रवाशांनी प्रवास केला. आणि त्यातून आगाराला ८९ लाख ९८ हजार १०७ रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोनाच्या काळातही कर्मचाऱ्यांचे धाडस !
कोरोना संसर्गामुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या दोन, पाच वर होती, शिवाय प्रवासासाठी २२  प्रवाशांचे निर्बंध होते. चालक, वाहकाने धाडस दाखवत ड्यूटी सुरू केली. एका चालकाला संसर्ग झाल्यानंतर सावध पवित्रा घेत इतर कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत सेवा सुरू केली. दरम्यान उमरगा आगाराचे मासिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असते. परंतू सद्यस्थितीनुसार इतके उत्पन्न मिळणे अशक्य आहे ; तरीही आगारप्रमुखाच्या नियोजनानुसार वाहक, चालक व कामगार यांच्यातील समन्वयातून लाल परिला आर्थिक उत्पन्नाचं बाळंस आलं आहे. 

" लॉकडाउनमुळे बससेवेला व्यत्यय आला होता. आंतरजिल्हा बसफेऱ्या सुरू झाल्याने उत्पन्नात हळूहळू वाढ होत आहे. बोरिवली, पूणे, औरंगाबादच्या फेऱ्या सुरू केल्या असून लांब पल्ल्याच्या आणखी फेऱ्या सुरू करण्यात येतील. उत्पन्न वाढीसाठी प्रवाशी दैवत ठरत असून वाहक, चालक व कामगार यांचेही सहकार्य महत्वाचे ठरत आहे. -

पी.व्ही. कुलकर्णी, आगारप्रमुख 
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT