hingoli photo
hingoli photo 
मराठवाडा

व्हिडिओ :भिक्षेतून चालतोय वासुदेव, गोंधळी बांधवांचा प्रपंच

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे भीक्षा मागून जगणारे अनेक जण अडचणीत आले आहेत. यात गोंधळी व वासुदेव यांचा समावेश आहे. सध्या शिथिलता मिळाल्याने गोंधळी व वासुदेव तोंडाला मास्‍क बांधून व सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करीत घरोघरी भीक्षा मागत आहेत.

येथे गोंधळी आणि वासुदेव समाजबांधवांची अनेक घरे आहेत. लग्नसराईत गोंधळी समाजाला कामे मिळतात. लग्नात गोंधळ करण्याची अनेक घरी परंपरा आहे. यासह विविध धार्मिक कार्यक्रमांतदेखील गोंधळ केला जातो. इतर वेळी गोंधळी घरोघरी जाऊन भिक्षा मागतात. 

भिक्षेवर चालतो उदरनिर्वाह 

वासुदेवदेखील भिक्षा मागून उरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना अडचणी आल्या आहेत. वासुदेव सकाळची गाणे म्हणून लोकांना उठवतात. त्यातच खंडोबाचे, देवीदेवतांची गाणे म्हणूनदेखील भिक्षा मागतात. यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चलतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे परिस्थिती बिकट बनली होती. 

टाळ वाजवत खंडोबाची गाणी 

गावात फिरण्यास बंदी होती. कोरोनामुळे दोन महिने अडचणीत गेली. लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने आता गोंधळी व वासुदेव भिक्षा मागत आहेत. तोंडाला मास्‍क बांधून तसेच सोशल डिस्‍टन्सिंगचे पाळत करीत भिक्षा मागितली जात आहे. वासुदेव डफ तुनतुने, टाळ वाजवत घरोघरी खंडोबाची गाणी गाताना दिसत आहेत. 

विविध प्रकारची गाणी

खंडोबारायाचे येड लागलं वाघ्याला, खंडेराया पावरे नवसाला, बालपणाची झाली मुरळी, शंकराने धरिला अवतार, देव झाले मल्हारी मार्तंड, असे विविध प्रकारची गाणी म्हणून प्रकाश घोगरे, बालाजी चव्हाण, पांडुरंग रेणके, नागनाथ जाधव प्रत्येक गावांमध्ये जाऊन भिक्षा मागताना दिसून येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागनाथ मंदिर, उद्यान बंदच


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग मंदिर व नागनाथ उद्यान हे गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंदच आहे. कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद करण्यात आली. त्यामुळे श्रीनागनाथ देवस्थानचे व नागनाथ उद्यानाचे मोठे नुकसान झाले आहे. 

रस्तेही निर्मनुष्यच

नागनाथ उद्यान बंद असल्यामुळे पर्यटक फिरकत नसल्यामुळे रस्तेही निर्मनुष्यच झाले आहेत. पाचव्या लॉकडाउनमध्ये विविध घटकांना शिथिलता दिलेली असली तरी मंदिरे अद्यापही बंदच आहेत. मंदिरे कधी उघडतील, याकडे भाविकांच्या नजरा लागलेल्या आहेत. तलावातील बोटिंगही बंदच असल्याने अनेकांचा रोजगारदेखील बंद झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT