biyane.jpg 
मराठवाडा

आता का पेरणीची वेळ गेल्यावर मोफत बियाणे देणार?

महेश गायकवाड

जालना : खरिप हंगामात  शेतकऱ्यांनी पेरलेल सोयाबीन बियाणे वांझोट निघाल. यात महाबीजबरोबर खासगी कंपन्याच्या बियाणांचाही समावेश आहे. कृषी विभागाकडे एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यानंतर शासनाने महाबीज कंपनीला बियाणे बदलुन  निर्देश दिले. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ते  मिळाल नाही. पेरणीची वेळ गेल्यावर बियाणे देणार का? असा संतप्त सवाल दुबार पेरणीची वेळ आलेले शेतकरी आता विचारत आहे. तर अनेकांनी मोफत बियाण मिळण्याची वाट न पाहता स्‍वखर्चातून दुबार पेरणी केली. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जिल्ह्याभरातून तब्बल एक हजार पाच शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे  उवगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी तीन प्रकरणात कृषी विभागाने चौकशी करून तीन कंपन्यावर शेतकऱ्यांची फसवणुक केली म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हे  दाखल केले आहे. तर आतापर्यंत पन्नास शेतकऱ्यांना नऊ कंपन्यानी नुकसान भरपाई म्हणून बियाणे बदलुन दिले. तसेच नुकसान भरपाईची दिली आहे.   कंपन्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांच झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार नाही.

न उगवलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांच्या मेहनत आणि पैशांबरोबर  पेरणीचा हंगामही  सरत आहे. त्यामुळे उशिरा पेरलेल्या बियाणातून उत्पादन मिळेल का? वेळेवर पाऊस न झाल्यास ते टिकेल का? असे प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर असताना अद्यापही बाेगस बियाणांच्या बदल्यात मोफत बियाणे शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी महाबीजच्या व्यवस्‍थापकांना अहवालाची वाट न पाहता तातडीने बियाणे बदलुन देण्याची कार्यवाही करण्याची सूचना दिलेली असताना कृषी विभागाकडून तक्रारीच्या पडताळणीसाठी होत असलेला विलंब  आणि  कृषी शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल  या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हातातून पेरणीची  वेळ  निघुन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस बियाण निघालेल्या कंपन्यावर कारवाई व्हायची तेव्हा होईल, पण शेतकऱ्यांची पेरणीची वेळ निघुन जायच्या आधी त्यांना बियाण बदलुन देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चार एकरमध्ये महाबीज कंपनीचे सोयाबीन  पेरले होते.  ते   न उगवल्याची तक्रार कृषी विभागात केली.  कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहणी करून गेंले. मात्र, बियाणे बदलुन मिळाल नाही. त्यामुळे पेरणीची वेळ निघुन जाईल म्हणून घरचे बियाणे पेरल.
महादेव वायाळ, शेतकरी मंठा


जिल्हयातील आठ तालुक्यात दहा पथकाद्वारे शेतात प्रत्यक्ष भेटी देऊन पंचानामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ५३४ तक्रारींची पडताळणी झाली असून पंचानामे सुरू आहे. पन्नास शेतकऱ्यांना आतापर्यंत नुकसान भरपाई मिळवुन देण्यात आली आहे.
सयप्पा गरांडे, गुणनियंत्रक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT