Latur News 
मराठवाडा

सोशल डिस्टन्स हा चुकीचा शब्द : भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांचे मत

सुशांत सांगवे

लातूर : सोशल डिस्टन्स (सामाजिक अंतर) हा शब्द आज जवळजवळ प्रत्येकाच्या ओठावर आहे. पण, पूर्वी अस्पृश्यता या अर्थाने तो वापरला जात होता. ती दूर व्हावी म्हणून अनेक समाजसुधारकांनी आपले जीवन खर्ची केले. अस्पृश्यता ही समाजविघातक प्रथा होती आणि आहे. मात्र, समाजविघातक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या या शब्दाचा उपयोग समाज टिकविण्यासाठी केला जात आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी (ता. २५) व्यक्त केले. ‘कोरोना’मुळे भाषांवर आघात होणार नाहीत किंवा त्या मरणार नाहीत, असेही ते म्हणाले.

एकीकडे ‘कोरोना’मुळे अनेक नवे शब्द चर्चेत आले आहेत. महानगरापासून खेडेगावातील व्यक्तीच्या ओठांवर हे शब्द आहेत. तर दुसरीकडे संवादाचे माध्यम बदलेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. देवी यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनावर सध्या एकच उपाय आहे, तो म्हणजे सोशल डिस्टन्स, असे दररोज आणि वारंवार जनतेला सांगितले जात आहे. या शब्दाचा वापर चुकीचा आहे. याऐवजी आपल्याला शारिरिक अंतर किंवा सुरक्षित अंतर हा शब्द वापरता येईल.

डॉ. देवी म्हणाले, कोरोना हा शब्द सध्या प्रत्येकाला माहिती झाला आहे. मुळात हा शब्द लॅटीन भाषेतील आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात मुकुट किंवा ताज या अर्थाने तो वापरला जायचा. राजा किंवा सम्राट यांच्यासाठी हा शब्द उच्चारला जायचा. पण, आजच्या काळात एका रोगासाठी हा शब्द उच्चारला जात आहे. येणारी नवी पिढी या शब्दाचा अर्थ ‘राज्याचा प्रमुख हा रोगासारखा असतो’, असा अर्थ काढेल. क्वारंटाईन हा शब्द आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरला जात असे. आता या शब्दाकडे शिक्षा किंवा डांबून ठेवणे, या अर्थाने पाहिले जात आहे. त्यामुळे शब्दाचे अर्थ सध्या उलटे होताना दिसत आहेत. यावर गंभीरपणे विचार झाला पाहीजे.

जेंव्हा माणसांची गती कमी होते, तेव्हा भाषा स्थिर राहतात. गती वाढते तेव्हा भाषा पोकळ होते. ती पोखरली जाते, हे तत्व आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट आले म्हणून भाषा संकटात येईल किंवा भाषा मरेल, असे अजिबात होणार नाही. उलट विस्मरणात गेलेले शब्द नव्याने वाचायला मिळत आहेत. लस, लागण असे अनेक शब्द पूर्वी फारसे वापरले जात नव्हते. ते आता पून्हा वापरात आले आहेत. कोरोनामुळे कुटूंब एकत्र आले आहे. त्यामुळे जुने शब्द पुर्नजीवित होत आहेत. इतकेच काय वर्तमानपत्रातही वाचायला मिळत आहेत, असे निरिक्षणही डॉ. देवी यांनी नोंदवले. छोट्या भाषांची स्थिती आहे तशी राहिल. ती सुधारणार नाही आणि बिघडणारही नाही, असेही त्यांनी सांगितले.

लेखनापासून स्वयंपाकापर्यंत

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घरी बसा, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी जवळपास महिनाभरापासून घरात बसून आहे. अनेक विषयांवर माझे लेखन सुरू आहे. काही विषयांवरील लेखन अर्धवट झाले होते. ते पूर्ण करत आहे. लेखनाबरोबरच दररोज स्वंयपाक करत आहे. घराची साफसफाईही मीच करतो. झुम किंवा स्काइपच्या माध्यमातून सेवा दलाच्या आमच्या ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका होत राहतात. अशा वेगवेगळ्या कामात सध्या मी गुंतलो आहे. त्यामुळे वेळ कसा घालवायचा, हा प्रश्न पडत नाही, असेही डॉ. देवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT