बदनापूर : येथील मुलांच्या वसतिगृहाची इमारत अलगीकरण कक्षासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्याची पाहणी करताना तहसिलदार छाया पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ओम ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश ढाकणे, आरोग्य पर्यवेक्षक सुदेश वाठोरे आदी. 
मराठवाडा

हुश्‍शऽऽऽ युवकाचा ताप होतोय कमी 

आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) - मुंबईहून बदनापूरला परतलेल्या एका तरुणास ताप आल्याने विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले होते, सध्या त्याला कुठलाही श्वसन विकार, सर्दी नसल्यामुळे तूर्त त्याची कोरोनाची तपासणी करण्याची गरज नाही. त्याचा तापही कमी झाला, अशी माहिती ग्रामिण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. ओम ढाकणे यांनी मंगळवारी (ता. २४) दिली.

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर बदनापूर येथील ग्रामिण रुग्णालयात विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची इमारत अलगिकरण कक्षासाठी निश्चित करण्यात आली आहे. 

राज्यात कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी थेट संचारबंदी आणि जिल्हाबंदीचा निर्णय लागू केला आहे. शिवाय प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमार्फत देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर बदनापूर येथील ग्रामिण रुग्णालयात विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यात कोरोनाशी संबंधित लक्षणे असलेल्या व्यक्तीला दाखल करण्यात येणार आहे. तर ग्रामीण रुग्णालयाला खेटूनच असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या पाठीमागील इमारतीत अलगिकरण कक्ष निश्चित करण्यात आले आहे. या कक्षात बाहेरगावाहून आलेले मात्र कोरोनाच्या संदर्भात कुठलीच लक्षणे नाहीत अशा लोकांना दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. 

दरम्यान, बदनापूर येथील ३० वर्षीय तरुण मुंबई येथे नोकरी करतो. तो दोन दिवसांपूर्वी बदनापूरला पोचला. त्याची आरोग्य तपासणी केली असता त्यास ताप असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विलगिकरण कक्षात दाखल केले आहे. त्याचा तापही कमी झाला असून त्यास २८ मार्चला सुटी मिळू शकते, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी मंगळवारी दिली.

घाबरून नका, मात्र काळजी घ्या

कोरोनाच्या बाबतीत कुणीही घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी. बाहेरगावाहून परतणाऱ्या आपल्या माणसांची माहिती प्रशासनास द्यावी, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही लक्षणे दिसून आली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासन व प्रशासन सांगत असलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करावे, अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. 
.............. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या अली’ गाण्याचे गायक जुबिन गर्गचं निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान मृत्यू, संगीतविश्वाला मोठा धक्का!

कोकणातलं जीवन दाखवणाऱ्या युट्यूबर स्वानंदी सरदेसाईला कशी मिळाली 'दशावतार' मध्ये गाण्याची संधी?

Easy Navratri Vrat Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा खास कुरकुरीत अन् चविष्ट करंज्या; लगेच लिहून घ्या ही सोपी रेसिपी

IND vs PAK लढतीपूर्वी मोदी सरकारचा मॅसेज, ४ मिनिटांत सूत्र हलली अन् पाकिस्तानी खेळाडूंचा अपमान; हस्तांदोलन प्रकरणात मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT