bkc 
मुंबई

Coronavirus : लवकरच सुरु होणाऱ्या बीकेसी रुग्णालयात 1000 रुग्णांमागे असणार इतके डॉक्टर, वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी)1026 खाटांचे रुग्णालय मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहे.तेथील 1000 रुग्णांसाठी 100 डॉक्‍टरांसह त्याच प्रमाणात परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 1000 खाटांच्या नव्या रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करत आहे. या विस्तारित रुग्णालयात 100 खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू केला जाण्याची शक्यता असून, कोव्हिड चाचणीव्यतिरिक्त सर्व आवश्यक चाचण्या व उपचार होणार आहेत.

बीकेसीतील मैदानावर सव्वा लाख चौरस फूट जागेवर अवघ्या 15 दिवसांत एमएमआरडीएने हे रुग्णालय उभारले आहे.पावसाळी तंबूच्या स्वरूपात उभारलेल्या या रुग्णालयासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.तीन महिन्यांनी फक्त तंबूचे भाडे द्यावे लागणार असून, इतर सर्व साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.तेथील 1026 खाटांसाठी महापालिका 100 डॉक्‍टरांची नियुक्ती करणार असून, त्यात एमडी (मेडिसीन) व भूलतज्ज्ञांचाही समावेश असेल.सध्या या रुग्णालयासाठी 13 डॉक्‍टर, 8 परिचारिका आणि 14 वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीकेसी येथील रुग्णालयासाठी आवश्यकतेनुसार डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात येईल, असे महापालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी सांगितले.या रुग्णालयाची जबाबदारी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे यांना देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

एमएमआरडीए या रुग्णालयाचा विस्तार करण्याचा विचार करत आहे.रुग्णालयाच्या बाजूला 1000 खाटांचे विस्तारित रुग्णालय बांधण्याचा विचार असून, तेथे 100 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

10 मोबाईल आयसीयू 
या कोव्हिड रुग्णालयात 10 मोबाईल आयसीयू युनिट आहेत.अधिक गरज भासल्याच जवळील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटने त्यांचे आयसीयू उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

  • कोव्हिडचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेले रुग्ण.
  • पॅथॉलॉजी लॅब, ईसीजी, क्ष-किरण विभाग, ऑक्‍सिजन बेड.
  • 18 वॉर्डमध्ये प्रत्येकी 28 खाटा; 504 खाटांसाठी कृत्रिम ऑक्‍सिजन.
  • 9 वॉर्डमध्ये 58 अशा 522 खाटा; 10 मोबाईल आयसीयू.
  • प्रत्येक वॉर्डला तीन स्वच्छतागृहे; गरज भासल्यास मोबाईल टॉयलेट. 
  • डॉक्‍टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची स्वतंत्र व्यवस्था.
  • -नाश्ता, दोन वेळच्या जेवणाची सोय.

100 doctors for 1000 patients, BKC hospital starts within two days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT