अँटीबॉडीज चाचणीत 75 टक्के पॉझिटिव्ह; कफ परेड झोपडपट्टीतील सिरो सर्वेक्षणातून उघड 
मुंबई

अँटीबॉडीज चाचणीत 75 टक्के पॉझिटिव्ह; कफ परेड झोपडपट्टीतील सिरो सर्वेक्षणातून उघड

मिलिंद तांबे

मुंबई : अँटीबॉडीज चाचणीत पॉझिटिव्ह येण्याचे देशातील सर्वाधिक दर मुंबईत नोंदवले गेले आहेत. कफ परेडमधील पाच झोपडपट्ट्यांमध्ये घेण्यात आलेल्या अँटीबॉडी चाचणीत 806 पैकी 605 रुग्णांना कोरोना अँटीबॉडीजची तपासणी पॉझिटिव्ह आढळली आहे. यातून झोपडपट्टी परिसरात लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आयबीट्स फाऊंडेशन, डॉ. निशांत कुमार आणि भाजपच्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांनी कफ परेड विभागातील सर्व झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी सिरो-प्रसार सर्वेक्षण केले. प्रभागातील पाच ठिकाणी 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या चाचण्यांमधून कोव्हिड अँटीबॉडीजच्या 75 टक्के लोकांचा पॉझिटिव्ह चाचणी अहवाल आला. पालिकेने केलेल्या सिरो सर्व्हेपेक्षा ही टक्केवारी अधिक आहे. पालिकेच्या सिरो सर्व्हेत झोपडपट्टीतील 45 टक्के आणि इमारतींमध्ये 18 टक्के चाचण्यांचे पॉझिटिव्ह निदान झाले होते.

कफ परेड परिसरातील मच्छीमार नगर, आंबेडकर नगर ट्रांझिट कँप, गणेशमूर्ती नगर 1, 2 आणि 3 आणि गीतानगरमध्ये लोकांची तपासणी करण्यात आली. या सिरो सर्व्हेबाबत आयबीट्सने प्रसिद्ध केकेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी सिरो सर्वेक्षणात पालिकेच्या सिरो सर्व्हेत नसलेल्या परिसराचा समावेश केला होता. शिवाय 806 रुग्णांपैकी केवळ आठ म्हणजे केवळ एक टक्के रुग्णांची कोव्हिड चाचणी यापूर्वी पॉझिटिव्ह आली आल्याचेही या अहवालात पुढे नमूद केले आहे. सिरो सर्व्हेच्या या अहवालात एकतर 99 टक्के बाधित लोक असिंथेमॅटिक असावेत किंवा कोरोना संसर्गाविषयीची माहिती लोकांनी सार्वजनिक केली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. शिवाय एकूण 31 टक्के लोकांनी त्यांना यापूर्वीही कोरोना संसर्गाची लागण झाली किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्याचेही टाळले असल्याचे नमूद केले आहे. 

या अभ्यासानुसार 18 ते 40 वयोगटातील 78 टक्के लोकसंख्या, 40 ते 60 वयोगटातील 74 टक्के लोकसंख्या तर 60 वर्षांवरील वयोगटातील 76 टक्के लोकांमध्ये कोव्हिड अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आढळली आहेत. सर्वेक्षणात चाचणी घेण्यात आलेल्यांपैकी पुरुषांमधील 70.8 टक्केच्या तुलनेत महिलांमध्ये सेरो प्रिव्हलन्स 79.3 टक्के इतके असल्याचे समोर आले आहे. 

झोपडपट्टी परिसरात लॉकडाऊन फारसा यशस्वी झाला नसल्याचे दिसते. अशा परिसरांमध्ये पुन्हा एकदा सखोल चाचण्या करण्याची गरज आहे.
- हर्शिदा नार्वेकर, नगरसेविका 

बहुतेक प्रकरणांमध्ये पुरुषांमध्ये सेरोप्रिव्हलेन्सचा दर जास्त असतो. आमच्या अभ्यासात लॉकडाऊननंतर महिलांमध्ये जास्त दर आढळला आहे. यातून असे सूचित होते की, झोपडपट्टीमध्ये स्त्रिया मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने संसर्गात वाढ होण्याची शक्यता वाढत आहे. 
- डॉ. निशांत कुमार, प्रमुख, आयबीट्स फाऊंडेशन

--------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT