मुंबई

हाफकीन औषध पुरवठा बंद प्रकरण : थकीत देयकांसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 22 : हाफकीन संस्थेला औषध पुरवठा करणाऱ्या पुरावठादारांची थकीत दिलं देण्यासाठी नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हाफकीच्या संचालकांनी पुरवठादारांना दिली. मात्र बिले मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.

वर्षेभरातील 103 कोटी रुपयांच्या थकीत बिलांच्या वसुलीसाठी राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला आहे. औषध वितरकांच्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस होता. 

रविवारपर्यंत प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने औषध वितरकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सोमवारी हाफकिन व्यवस्थापकीय संचालक राठोड यांच्याशी बोलणे होऊन देयके अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले असल्याची माहिती अभय पांडे यांनी दिली. तसेच मंगळवारी या प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला. त्यासंदर्भातील पत्र ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनकडून हाफकिन बायोफार्मास्युटीकलला पाठवले होते. राज्यातील 100 पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल 103 कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला होता. त्यानुसार जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला आहे. त्यासंदर्भातील पत्र ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनकडून हाफकिन बायो फार्मास्युटीकलला पाठवले आहे. 

राज्याच्या औषध खरेदी कक्षाकडून 2019-20 मध्ये औषध वितरकांकडून कोट्यवधी रुपयांची औषधे मागवण्यात आली होती. मात्र यातील 103 कोटी रुपयांची देयके खरेदी कक्षाकडून थकवण्यात आली आहेत. ही देयके मिळावीत यासाठी वर्षभरापासून औषध वितरकांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्याकडे खरेदी कक्षाकडून दुर्लक्ष करून औषध वितरकांची देयके मंजूर करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे औषध वितरकांनी 14 डिसेंबरपासून औषध पुरवठा बंद केला आहे. त्यानंतरही खरेदी कक्षाकडून देयके देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल होत नसल्याने औषध वितरकांनी निविदा प्रक्रियेमध्येही सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 26 जूनपासून काढण्यात आलेल्या तब्बल 83 निविदांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. बहिष्कार टाकलेल्या निविदांची अंतिम मुदत ही 23 डिसेंबरपासून 6 जानेवारीपर्यंत आहे. डिसेंबरपूर्वी काढलेल्या निविदांमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा काही आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासंदर्भात खरेदी कक्षाकडून वितरकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या पूर्ततेच्या प्रक्रियेतही वितरकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी हाफकिन व्यवस्थापकीय संचालक यांनी देयके अदा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मंगळवारीही थकीत बिलांच्या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत आमची देयके मंजूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही औषधांचा पुरवठा बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवणार आहोत, असं अभय पांडे (अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन) यांनी म्हंटलं आहे. 

Appointment of Nodal Officer for arrears payments halfkin medicines supply case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT