ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या सौंदर्याला उतरती कळा 
मुंबई

ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या सौंदर्याला उतरती कळा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या नेरूळ येथील "ज्वेल ऑफ नवी मुंबई'ला विविध समस्यांनी ग्रासले आहे. या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटक, तरुणांच्या तसेच पालिकेच्या बेपर्वाईमुळे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या सौंदर्याला उतरती कळा लागली आहे. या ठिकाणचे मुख्य आकर्षण असलेला "ज्वेल'लाच (हिऱ्याची प्रतिकृती) ठिकठिकाणी तडा गेला असून, लाईट्‌सही तुटलेले आहेत. त्याशिवाय बाकांची दुरवस्था, खुल्या जिममधील तुटलेली व्यायामाची साधने, हिरवळीवर तसेच तलावाकाठी साचलेला कचरा यामुळे या सुंदर परिसराची रया गेली आहे. 

पालिका प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी सुंदर उद्याने, प्रेक्षणीय स्थळे उभारली आहेत. विरंगुळ्याकरता या ठिकाणांना सकाळ-संध्याकाळी भेट देणाऱ्या पर्यटकांची त्यातही तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. असेच शहराचे प्रमुख आकर्षण स्थळ असलेल्या नेरूळ येथील "ज्वेल ऑफ नवी मुंबईला'ही रोज अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी, वॉकिंग, जॉगिंगसाठी येतात. सुरुवातीस अतिशय सुंदर असलेल्या मात्र आता बकालपणा आलेल्या परिसराला पाहून बेजबाबदार तरुणाई व पालिका प्रशासनाविरोधात नागरिकही रोष व्यक्त करत आहेत. 

स्थानिक योगीता शेट्टी यांनी सांगितले, की सकाळच्या सुमारास काही नागरिक येथे आपल्या श्‍वानांना घेऊन येतात. त्यांची विष्ठा ट्रेकवर किंवा ट्रेकशेजारी हिरवळीवर पडलेली असते. ती साफ करण्याची तसदीदेखील घेतली जात नाही. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी पाईपलाईनमधून सांडपाणी तलावात सोडले जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी फरशा निखळलेल्या आहेत; तर काही ठिकाणच्या विजेच्या तारा तोडण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ट्रकशेजारी चाफ्याची झाडे लावली आहेत. या झाडांवरील फुले, फांद्या अशापद्धतीने ओरबाडून नेली आहेत, की ती अक्षरशः बोडकी दिसू लागली आहेत. ज्वेलमधील माहिती फलकही काही न काही गिरबटून खराब करण्यात आले आहेत. 

प्रेमीयुगुलांचे ग्रहण 
ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर रात्री उशिरापर्यंत जोडपी येतात. तसेच मुलामुलींचे समूहदेखील येतात. या मुलांची सार्वजनिक मालमत्ता हताळण्याबाबतची बेफिकिरी बाकांवर कोरलेली नावे, हिरवळीवर टाकलेले खाद्यपदार्थांचे कागद, प्लास्टिकच्या वस्तू, बाटल्या पाहिल्यास लक्षात येते. या मुलांना समज देण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक नावेद सिद्दिकी यांनी व्यक्त केले. 

सकाळी नियमितपणे व्यायाम केल्यानंतर दोन मिनिटे निवांत बसायचे म्हटले तर येथील अनेक ठिकाणची बाके तुटलेली आहेत. खुल्या जिममधील व्यायामाच्या साधनांचीदेखील दुरवस्था झाली आहे. सतत स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत या तक्रारी पालिकेपर्यंत पोहचवण्याचे काम करतो. काही महिन्यांपूर्वी येथे फिरावयास येणाऱ्या विविध गटांच्या माध्यमांतून स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली होती. 
- सुरेश भोसले, नागरिक. 

या ठिकाणी संध्याकाळच्या व रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त असते; मात्र ती पाम बीच मार्गाने असते. येथील सुरक्षा रक्षक मधूनच कधी तरी एखादा फेरफटका मारताना दिसतो. हा परिसर खूप मोठा असल्याने येथे आणखी काही सुरक्षा रक्षकांची आवश्‍यकता आहे. पुरेशा सुरक्षेअभावी रात्रीच्या सुमारास एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. 
- सुजाता पगारे, नागरिक.

दोन दिवसांत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह ज्वेल ऑफ नवी मुंबईची पाहणी करणार आहोत. तिथे पुरेशी वीजेची व्यवस्था उपलब्ध केली जाईल. तसेच पुरेशी सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ENG 5th Test: ट्रॅव्हिस हेडने इंग्लंडच्या गोलंदाजांची काढली हवा; शतक झळकावले, असा पराक्रम केला जो जगात फक्त पाच जणांना जमला

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींचा खटला ९२ वर्षीय न्यायाधीशांसमोर, अमेरिकेत जज निवृत्त का होत नाहीत? वयोमर्यादेची अटच नाही

Pimpri News : पिंपरीत एबी फॉर्मच गहाळ; निवडणूक अधिकारी दोषी

Suresh Kalmadi: सुरेश कलमाडींनी विमानातून बॉम्बहल्ला केला अन् मिझोराम भारतातील २३ राज्य बनले, काय आहे किस्सा?

Chandrabhaga River Pollution: कोट्यवधींचा खर्च पाण्यात! पवित्र चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा; जलचर प्राणी,‌भाविकांचे आरोग्य धोक्यात..

SCROLL FOR NEXT