लॉकडाऊनमुळे गर्भवतीच्या अवकळा; मात्र, तो देवदुतासारखा धावून आला... 
मुंबई

लॉकडाऊनमुळे गर्भवतीच्या अवकळा; मात्र, तो देवदुतासारखा धावून आला...

सकाळ वृत्तसेवा

मुरबाड  : गर्भवती महिलेची प्रसूती कळांमुळे होत असलेली तगमग.. त्यातच एक दोन गावांमधील रुग्णालयांनी तीला रुग्णालयात दाखल करुन घ्यायला दिलेला नकार.. कुटूंबीयांच्या खिशात पुरेसे पैसेही नाहीत.. सर्वत्र लॉकडाऊनमुळे गैरसोईची परिस्थिती.. अशातच एक डॉक्टर देवदूतासारखा मदतीला धावला आणि महिलेची प्रसूती केली. 

माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या डोंगरवाडी येथील वंदना हैबत बांगारा ही महिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने कुटुंबीयांनी शुक्रवारी (ता.24) पहाटे तीन वाजता घरातून निघून तिला टोकावडे ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेचे सिझरिन करावे लागेल, तसेच सिझेरियनची सोय आमच्याकडे नाही असे सांगत रुग्णवाहिका सोबत देऊन तिला उल्हासनगर येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. 

 रुग्णवाहिकेने महिलेला उल्हासनगर रुग्णालयात सोडले आणि ती परत टोकावडे येथे निघून गेली.  महिले सोबत असलेल्या नातेवाईकांनी तिचा केस पेपर काढायला गेले, असता तेथील कर्मचाऱ्यांनी येथे कोणीही डॉकटर उपलब्ध नाहीत असे सांगितले. तसेच  तुम्ही महिलेला कळवा येथे रुग्णालयात घेऊन जा असे सांगून प्रवेश नाकारला. रुग्णवाहिका परत निघून गेलेली, महिलेला कोठे न्यायचे आहे त्याची पुरेशी माहिती नाही. त्यातच लॉकडाऊन मुळे कळवा येथे जायचे कसे, यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी रिक्षाला अकराशे रुपये भाडे देऊन तिला महिलेला मुरबाड येथे आणले.

 मुरबाड येथिल तन्मय नर्सिंग होम मध्ये डॉ. जितेंद्र बेंडारी यांनी गरोदर महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच तिची नैसर्गिक प्रसूती केली. प्रसूती दरम्यान महिलेच्या शरीरातून मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे तिला रक्त देणे गरजेचे होते. यावेळी तीच्या कुटूंबियांकडे पुरेसे पैसे नसल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना पैसे देत स्वत: खाजगी गाडीची व्यवस्था केली आणि बाहेरुन रक्त आणून महिलेचे प्राण वाचले. एवढेच नव्हे तर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून रात्रभर उपाशी असलेल्या महिलेच्या कुटूंबियांची जेवणाची सोय देखिल केली.

नैसर्गिक प्रसूती केली
सुरुवातीला एका रुग्णालयात महिलेले सिझेरीयन करावे लागेल असे कारण देत तीला रुग्णायात दाखल करुण घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे महिलेच्या कुटूंबियांची इतर दोन ठीकाणी रुग्णालयात तीला घेऊन जाताना धावपळ झाली. मात्र डॉ. जितेंद्र बेंडारी महिलेला रुग्णालयात दाखल करुन घेत तिची नैसर्गिक प्रसुती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT