मुंबई

तब्बल १७६ फेक अकाऊंट बनवणारा तरुणाला मुंबईतून अटक

पूजा विचारे

मुंबईः सोशल मीडियावर फेक अकाऊंट्स बनवणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणानं आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया मार्केटिंग (SMM) या रॅकेटमध्येही काम केल्याचं उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई करत त्याला अटक केलीय. अभिषेक दौडे असे आरोपीचं नाव असून तो कुर्ला येथे राहतो. या रॅकेटच्या आधारे त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाइल तयार केले आणि विकले. 

एखाद्या व्यक्तीची प्रोफाईल प्रभावक म्हणून वापर करुन कृत्रिमरित्या सोशल मीडियावर फॉलोअर्सच्या संख्येत वाढवण्याचं काम हा तरुण करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

जास्त फॉलोअर्स असलेल्या लोकांना सोशल मीडियावर मोठी मागणी असते.  फॉलोअर्स जास्त असतील तर  एखाद्या कंपनीचे किंवा एखाद्या ब्रँडच्या उत्पादनास मान्यता देऊन त्यांची विक्री वाढवता येते. बॉलिवूडमधील पार्श्वगायिका भूमी त्रिवेदी यांनी  मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तिनं आपल्या तक्रारीत म्हटलं की,  कोणीतरी माझ्या नावाचं इंस्टाग्रामवर फेक प्रोफाइल तयार केली आहे. या रॅकेटच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केलेल्या गुन्हे शाखेने मंगळवारी कुर्ल्यातील गौरी शंकर नगर येथे राहाणारा दौडे यांना अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

इंस्टाग्राम, टिकटॉक, फेसबूक या सोशल मीडिया साईटवर आरोपीनं एकूण १७६ फेक अकाऊंट्सवर ५ लाख फेक फॉलोअर्स बनवले.  हे फेक अकाऊंट्स मॅन्युअली किंवा सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार केले जातात. सामान्यत: त्याला बॉट्स म्हणतात. 

अधिकाऱ्यानं सांगितले की, आरोपी दौडे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला 17 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

fake profiles accused Abhishek Daude Mumbai Police's Crime Branch arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT