best electricity. 
मुंबई

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अनेक वीज कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजवापरावर अनिर्बंध आकारणी करून ती वसूल करण्याचा सपाटा लावत असताना, बेस्ट उपक्रमाने मात्र बिलापोटी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ग्राहकांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा होणार आहे.

वीज बिलापोटी घेतलेली जादा रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला असला तरी, ज्यांना सरासरी वापरावर दिलेल्या अंदाजित रकमेची बिले प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी रकमेची असल्यास, त्यांना बिलंबशुल्कासह (व्याजासह) तीन समान मासिक हप्त्यात रक्कम भरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.  

बेस्टने टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना दिलेली वीजबिले ही मार्च महिन्याच्या वीजवापरावर आधारित आहेत. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांच्या काळात साधारणपणे विजेचा वापर अधिक होतो. त्याचप्रमाणे लॉकडाऊनध्ये नागरिक घरी असल्यामुळे निवासी वीजवापरामध्ये वाढ झालेली आहे. त्यावर आधारित अंदाजित बिले सादर करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष वीजमापन घेतल्यानंतर ज्या ग्राहकांना जास्त रकमेची बिले देण्यात आलेली आहेत, अशा ग्राहकांना त्यांची जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला आहे. ही रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना कमी रकमेची बिले देण्यात आली आहेत, त्यांना प्रत्यक्ष वापरावर आधारित बिले सादर करण्यात येणार आहेत.

बेस्ट उपक्रमाने रेड झोन वगळता इतर भागात मीटर रिडींग करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष वापरावर वीजबिले आकारण्यास सुरुवात होणार आहे. बेस्ट उपक्रम जादा घेतलेली रक्कम व्याजासह परत करणार आहे. त्याचप्रमाणे ज्याना मार्च ते मे या तीन महिन्यात सरासरी तत्त्वावर दिलेल्या देयकापेक्षा दुप्पट वा अधिक देयक रक्कम आली असेल अशा ग्राहकांना व्याजासह तीन मासिक सुलभ हप्त्यात देयकाची रक्कम भरण्याची सवलत देण्यात येईल, असेही बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे.

बेस्टच्या या निर्णयामुळे अवास्तव वीजबिल आकारणीमुळे ग्राहक मेटाकुटीला येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कंपन्यांचे नुकसान झाले आहेच, पण लोकांचेही अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे ग्राहकही भरडला जाणार नाही आणि कंपनीचेही नुकसान होणार नाही असा मध्य बेस्ट उपक्रमाने साधला आहे. त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

SCROLL FOR NEXT