transport 
मुंबई

कसं असेल लॉकडाऊननंतरचं सार्वजनिक आयुष्य ? सुरु आहे 'या' पर्यायांचा विचार...

वृत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याची गरज असेल. पण सार्वाजनिक वाहतूक सुरु करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे नेमके तसे करणे अवघड असेल हा विचार करुन विविध पर्याय तपासून बघितले जात आहेत. 

मुंबईतील साडेचारशे किलोमीटर लांबीच्या उपनगरी रेल्वे जाळ्याचा फायदा रोज साडेसात लाख प्रवाशांना होतो. मुंबईतील 443 मार्गावर धावणाऱ्या सुमारे साडेतीन हजार बसमधून 50 लाख जण प्रवास करतात. आता या परिस्थितीत ही गर्दी कमी कशी करणार हा प्रश्न आहे. वर्क फ्रॉम होमला अनेक कंपन्या पसंती देणार अशी चिन्हे आहेत. त्यानंतरही सार्वजनिक वाहनातील गर्दी कमी करण्याकडे लक्ष देण्याची गरज असेल. 

वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करतानाच त्यामुळे रस्त्यावरील खासगी वाहने वाढणार नाहीत, याकडेही लक्ष देण्याची गरज असणार आहे. त्यासाठी काही वाहतूक तज्ज्ञ सायकलींचा मुंबईतील वापर कसा वाढेल, याकडे लक्ष देण्याची सूचना करीत आहेत. मुंबईतील अनेक जण आठ ते दहा किलोमीटरसाठी सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य देतात. त्याऐवजी सायकलिंगला जास्त चालना दिल्यास त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षित अंतर पाळणे शक्य होऊ शकेल, असे मानले जात आहे.

सायकलिंगला चालना देण्यासाठी त्यासाठी खास लेन तयार करण्याची सूचना वाहतूक तज्ज्ञांनी मुंबई महापालिका तसेच मुख्यमंत्र्यांना केली आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सायकलिंग सुरक्षित तसेच स्वस्त असेल. त्याचबरोबर सायकलींच्या दुरुस्तीच्या दुकानाने रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील, असा विचारही आहे. 

उपनगरी रेल्वे तसेच महापालिका परिवहनच्या फेऱ्या वाढवण्याचाही विचार आहे. त्याचबरोबर कार्यालयात आल्यावर कर्मचाऱ्यांना शॉवर घेण्याची सुविधा देता येईल का याचा विचार आहे. याचवेळी मेट्रो कामाला वेग दिल्यास उपनगरी रेल्वे तसेच परिवहन सेवेवरील ताण कमी होऊ शकेल, असाही विचार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डूल्ला निलंबित; विद्यार्थ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर कारवाई

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT