सिडको महागृहनिर्माण लाभार्थींसमोर आर्थिक पेच 
मुंबई

गृहकर्जासह घरभाडे कसे भरायचे? : सिडको महागृहनिर्माण लाभार्थींसमोर आर्थिक पेच

शरद वागदरे

वाशी : सिडकोच्या ऑगस्ट 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी महागृहनिर्माण योजनेंतर्गत 14 हजार 838 घरांची लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीतील साडेतीन हजारांपेक्षा जास्त लाभार्थींनी घराची पूर्ण रक्कम सिडकोला दिली आहे. यातील अनेक जण भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांना घरभाड्यासह गृहकर्ज भरावे लागत आहे. त्यात घरांचा ताबाही उशीराने मिळणार असल्याने ते आर्थिक विवंचनेत आहेत. यातील अनेक लाभार्थी व्हॉट्‌सऍप गुप्रद्वारे एकवटले असून त्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा, असा पत्रव्यवहार केला आहे. 

सिडकोच्या वतीने घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी व कळंबोली या भागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प घटकांसाठी 14 हजार 838 घरांची महागृहनिर्माण योजना दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट 2018 रोजी जाहीर केली होती. या घरांचा ताबा रेरा कायद्यानुसार ऑक्‍टोबर 2020 ते मार्च 2021 मध्ये टप्याटप्याने देण्यात येणार होता. पण, कोरोनामुळे घरांचे काम रखडले आणि रेराने बांधकाम व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. यामुळे लाभार्थींना ऑक्‍टोबरपासून मिळणाऱ्या घरांचा ताबा आता पुढील वर्षी मिळणार आहे. 

घरांचा ताबा उशीरा मिळणार असला, तरी पात्र लाभार्थींनी घराची रक्कम सिडकोकडे भरली आहे. यासाठी बहुतेक जणांनी गृहकर्ज घेतले असून हप्ताही सुरू झाला आहे. यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची नामुष्की झाली आहे. त्यांना आपल्या तुटपुंज्या पगारातून भाडे आणि गृहकर्ज दोन्ही भरावे लागत असल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत अडकले आहे. यामुळे घर चालवायचे कसे? असा प्रश्नही त्यांच्यासमोर आ वासून आहे. यासाठीच अनेक लाभार्थी समाज माध्यमांवर एकवटले असून सिडको प्रशासनाला लवकरात लवकर घरांचा ताबा मिळावा यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यातही आहे. या संदर्भात जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

प्रवेशद्वारावर अडवले 
मागील आठवड्यात 20 ते 25 लाभार्थी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना प्रवेशद्वारवरच अडवण्यात आले. त्यामुळे लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुद्रांक शुल्काचा दिलासा 
घराची नोंदणी करण्यासाठी सिडकोकडून मुद्रांक शुल्क हे फक्त एक हजार रुपये घेण्यात येणार आहे. यामुळे लाभार्थींना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Gold Rate: पैसे तयार ठेवा! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT