मुंबई

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्यांची संपूर्ण यादी

सुमित बागुल

मुंबई : गणपती उत्सव २०२० दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या  सोयीसाठी मध्य रेल्वे   छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस  आणि सावंतवाडी रोड / कुडाळ / रत्नागिरी दरम्यान  १६२ विशेष गाड्या चालविणार आहे.  या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील.  दरम्यान, प्रवाशांना बोर्डिंग करतेवेळी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानावर  कोविड-19 संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

 १. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (१६ फे-या) 

  • ०११०१ विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २३.०५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसर्‍या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.  
  • ०११०२ विशेष सावंतवाडी रोड येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज १०.१० वाजता सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी २१.४० वाजता पोहोचेल.
  • थांबे:  दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

२.  लोकमान्य टिळक टर्मिनस  - कुडाळ - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष  (१६ फे-या) 

  • ०११०३ विशेष  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २३.५० वाजता सुटेल आणि कुडाळला दुसर्‍या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. 
  • ०११०४ विशेष कुडाळ येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २३.०० वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा,  आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  - सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष  (१६ फे-या) 

  • ०११०५ विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत दररोज २२.०० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसर्‍या दिवशी ०८.१० वाजता पोहोचेल.
  • ०११०६ विशेष सावंतवाडी रोड येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज ०८.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच दिवशी २०.०५ वाजता पोहोचेल.
  • थांबे :   दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि  कुडाळ.

 ४. लोकमान्य टिळक टर्मिनस   - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष  (१६ फे-या) 

  • ०११०७ विशेष  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १५.८.२०२० ते २२.८.२०२० पर्यंत  दररोज २०.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. 
  • ०११०८ विशेष रत्नागिरी येथून दि. १६.८.२०२० ते २३.८.२०२० पर्यंत दररोज ०६.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १४.२० वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि  संगमेश्वर रोड.

 ५.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष  (२४ फे-या) 

  • ०११०९ विशेष  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०७.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १९.१५ वाजता पोहोचेल.
  • ०१११० विशेष सावंतवाडी रोड येथून २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज २०.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.
  • थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

 ६.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष  (२४ फे-या) 

  • ०११११ विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०५.५० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १६.१५ वाजता पोहोचेल.
  • ०१११२ विशेष सावंतवाडी रोड येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसर्‍या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
  • थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

 ७.  लोकमान्य टिळक टर्मिनस -   सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष  (२६ फे-या) 

  • ०१११३ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २४.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ०५.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी १५.५० वाजता पोहोचेल.  
  • ०१११४ विशेष  सावंतवाडी रोड येथून दि. २४.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज १७.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०६.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

 ८. लोकमान्य टिळक टर्मिनस  - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (२४ फे-या) 

  • ०१११५ विशेष  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज ११.५५ वाजता सुटेल आणि रत्नागिरीला त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल
  • ०१११६ विशेष  रत्नागिरी येथून दि. २५.८.२०२० ते ५.९.२०२० पर्यंत दररोज २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०४.१५ वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

या सर्व आरक्षित विशेष गाड्यांची संरचनाः १३ शयनयान (स्लीपर क्लास), ६ आरक्षित सामान्य द्वितीय श्रेणी , १ द्वितीय   वातानुकूलित (एसी -२ टायर), ४ तृतीय वातानुकूलित (एसी-3 टायर ) डब्बे अशी असेल 

आरक्षण : या विशेष गाड्यांसाठी बुकिंग १५.८.२०२० पासून आरक्षण केंद्रांवर आणि  www.irctc.co.in  या वेबसाइटवर सुरू होईल.

list of all the trains that will be run by central railways during ganesh utsav to konkan

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT