शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस 
मुंबई

'वाजपेयींनी पवारसाहेबांना दिला होता सत्ता स्थापनेचा प्रस्ताव'

तुषार खरात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सतत अपप्रचार केला जातो. पवार साहेबांचे नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध जोडले जातात. पण त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादी पक्ष विचारधारेशी तडजोड करणारा नाही. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. त्या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी पवारसाहेबांना बोलावून महाराष्ट्रात शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण पक्षाने विचारधारेशी तडजोड केली नाही, अशा भावना व्यक्त करीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही, असे संकेत दिले.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या ‘चिंतन शिबीरा’मध्ये त्यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले. शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारचा पाठींबा काढून घेतला तर राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देऊ शकते असे तर्क राजकीय वर्तुळात मांडले जात होते. पण ‘ती जागा राष्ट्रवादी भरून काढणार नाही’ असे नमूद करून पटेल यांनी भाजपसोबत राष्ट्रवादी जाणार असल्याची शक्यता फेटाळून लावली. 

आगामी लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूकही एकत्र घेण्याचा निृ्णय भाजप सरकार घेऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची लाईन निश्चित करून पक्षाने कामाला लागले पाहीजे असे शरद पवार यांचे मत असल्याने ही चिंतन बैठक आयोजित केल्याचेही पटेल यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT