File Photo 
मुंबई

मराठी विकीपीडिया होणार आणखी समृद्ध

उत्कर्षा पाटील

मुंबई : मनात आलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर विकीपीडियावर सहज मिळते. त्यामुळे मराठी विकीपीडिया अधिक समृद्ध करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्‍वकोश संकेतस्थळावरील माहितीही आता विकीपीडियावर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विश्‍वकोश मंडळ आणि विकीपीडिया यांच्यात नुकताच करार झाला.

तसाच करार औरंगाबाद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाबरोबरही केला आहे. मराठी विकीपीडियावर ५५ हजार ८८३, हिंदी विकीपीडियावर एक लाख; तर इंग्रजी विकीपीडियावर ५० लाखांहूनही अधिक लेख आहेत. मराठी विकीपीडियावरील नवीन लेखांची संख्या वाढावी, यासाठी मराठी विश्‍वकोश मंडळाशी करार करण्यात आला.

त्यानुसार विश्‍वकोशाच्या संकेतस्थळावर अपलोड होणारी माहिती मराठी विकीपीडियावरही उपलब्ध होईल. विश्‍वकोश मंडळाचे लेखक विकीपीडियासाठी लेखन करतील. विकीपीडियाची माहिती विश्‍वकोशासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे माहितीचे आदान-प्रदान होईल, असे मराठी विकीपीडियाचे प्रचालक आणि विकीपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय भाषांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची नवीन माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सप्टेंबर २०१९ मध्ये भारतीय भाषा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पासाठी केंद्राने काही कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि विकीपीडिया यांच्यात डिसेंबर २०१९ मध्ये तंत्रज्ञानविषयक करार केला आहे.

ट्रान्स्लेटर मशीनसाठी विद्यार्थ्यांची मदत
इंग्रजी भाषेतील माहिती मराठीत भाषांतरित करण्यासाठी ट्रान्स्लेटर मशीन अद्ययावत असणे आवश्‍यक आहे. त्यावर मराठवाडा विद्यापीठातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील पीएच.डी.चे विद्यार्थी काम करत आहेत, असे मराठी विकीपीडियाचे प्रचालक आणि विकीपीडिया भारताचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले. त्यांची मदत घेऊन या प्रकल्पाची आखणी केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग इंग्रजीतून मराठीत भाषांतरासाठी होईल. त्यासाठी मराठी विकीपीडिया विद्यार्थ्यांना तांत्रिक मदत करील, असे ते म्हणाले.

Marathi Wikipedia will be even more prosperous

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT