weather update sakal
मुंबई

Weather Update: मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता

नवी मुंबई आणि साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने डोके वर काढले आहे. नवी मुंबई आणि साताऱ्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोबतच वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहनसुद्धा करण्यात आलंय. (meteorological department says rainfall in mumbai in next 2 3 days)

गेल्या काही दिवसांत देशसह महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला (temperature rise) आहे. एकीकडे देशात तापमान वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे वातावरणात बदल होऊन आरोग्यावरही परिणाम पडू शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेता वातावरणामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहनसुद्धा करण्यात आलंय.

मुंबईचं तापमान सर्वाधिक असतं. मात्र मुंबईत येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने मुंबईकरांना आता उन्हाळ्याच्या दिवसात गारवा अनुभवता येणार आहे.

पुण्यातही आज अंशतः ढगाळ वातावरणा राहण्याची शक्यता असून हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT