मुंबई

फुलपाखरे बघण्यासाठी आता 'कलर कोड'; माथेरानमधील फुलपाखरांच्या 140 जातींवर मुंबईच्या तरुणांचे संशोधन

मिलिंद तांबे

मुंबई : फुलपाखरं केवळ फुलांवरच जगतात असं नाही बरं का, तर चिखलातून अन्न शोधणं ही त्यांना जमतं ही नवी माहिती आता समोर आली आहे. मुंबईतल्या दोन तरुण संशोधकांनी यावर संशोधन करून ही नवीन महत्वाचाही माहिती समोर आणली. इतकेच नाही तर विविध रंग, छटा, आकार असलेली फुलपाखरं बघण्यासाठी आता कोणता ऋतू निवडावा यासाठी एक 'कलर कोड' संशोधन ही त्याांनी केलंय.

मुंबईतल्या दोन संशोधकांनी माथेरानच्या जंगलात यासाठी तब्बल 8 वर्षे घालविली. त्यांच्या या संशोधनाची दखल एका आंतरराष्ट्रीय जर्नलने देखील घेतली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील संशोधक मंदार सावंत, सोमय्या महाविद्यालयातील सागर सारंग या द्वयींनी 2011 ते 2019 या काळात माथेरानमधील फुलपाखरांचा अभ्यास केला. येथे नेमकी कोणती फुलपाखरं आढळतात, याविषयी ठोस शास्त्रीय अभ्यास झालेला नव्हता. 1894 मध्ये ब्रिटिश निसर्गप्रेमी बेथम याने थोडा अभ्यास केला, पण तो त्रोटक होता. मंदार आणि सागरने माथेरानच्या घाटमाथ्यावरील 6 भाग तसेच रस्ता आणि रेल्वे मार्ग अभ्यासासाठी निवडले. त्यात त्यांना रंजक गोष्टी आढळल्या. निखिल मोडक याने संशोधन मांडणीला मदत केली. 

आतापर्यंतच्या समजुतीनुसार फुलपाखरे फुलांवरच आढळतात, मात्र ते चिखल, मृत प्राणी- पक्षी, सडलेली फळे, पक्ष्यांची-माणसांची विष्ठा यावरही जगतात.  फुलपाखरे सामान्यतः वनस्पती, गवत यावर अंडी घालतात. तसेच चिखल म्हणजे दलदलीच्या प्रदेशात त्यांचे प्रमाण जास्त असते. माथेरान हे त्यांच्यासाठी अधिवासाचे एक महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळेच येथे तब्बल 140 प्रकारची फुलपाखरं आढळली. फुलपाखरं ठराविक ऋतूनुसार आढळतात. तसेच ते ठराविक ऋतूत विशिष्ट कार्य करतात. हे टिपण्यासाठी या संशोधकांनी कलर कोड तयार केला. फुलपाखरांसाठी असा कलर कोड करणारे ते पहिलेच संशोधक आहेत. त्यासाठी त्यांनी 15 रंग वापरले. तुम्ही माथेरानला फिरायला गेल्यावर या कलर कोडचा वापर करून कोणती फुलपाखरं बघायला मिळतील, याचा अंदाज येऊ शकतो.

या अभ्यासात त्यांना काही अति दुर्मिळ फुलपाखरं आढळली. एरवी मुंबई आढळणारी ऑरेंज टेल्ड आवलेट, ऑरेंज आवलेट किंवा डबल ब्रँडेड क्रो अशी फुलपाखरं दृष्टीस पडली. डबल ब्रँडेड क्रो हे फुलपाखरू तर  8 वर्षात केवळ एकदाच आढळले. यावरून माथेरांमधील निसर्ग संपदा वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सिद्ध होते, असे मंदारचे म्हणणे आहे.

Photo Feature : फुलपाखरांच्या विश्वात....

चिखलही फुलपाखरांसाठी महत्वाचा
फुलपाखरं चिखलात बसून काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चिखलातून ते अन्नद्रव्ये तर शोषतातच मात्र, मिलनाच्यावेळी मादीला ते एक भेटही देतात, ती या चिखलातूनच. त्यामुळे दलदल किंवा चिखल फुलपाखरांसाठी किती महत्वाचा आहे हे समजते.

पर्यटकांसाठी माथेरान आवडीचे ठिकाण आहे. पण हेच पर्यटक फुलपाखरांसाठी अडथळा ठरत आहेत. पर्यटकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.    
- मंदार सावंत, संशोधक, बीएनएचएस, मुंबई.

---

संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Astrology : फडणवीसांसाठी कटकटीचा काळ ते राज्याच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची शक्यता...जाणून घ्या या आठवड्याचं राजकीय भविष्य!

मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं, आजोबा बंडू आंदेकरसह ११ जणांवर गुन्हा दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT