helmet sakal
मुंबई

विनाहेल्मेट दुचाकी चालवताना आढळल्यास ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द

विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणं आता महागात पडू शकते. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत मुंबई पोलिसांनी दिले आहेत. विना हेल्मेट गाडी चालवल्याबद्दल पूर्वी दुचाकीस्वाराला फक्त ई-चलन जारी केलं जात असे. आता या चलनाचा तपशील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) पाठवून त्याचा चालक परवाना रद्द करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे. हेल्मेट नसल्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागतो. यासाठी पोलिसांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे.

पोलिस उपायुक्त (वाहतूक मुख्यालय) राज टिळक रौशन यांनी मुंबई पोलिसांच्या पेजवर शेअर केलेल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू करण्यात आली आहे. यातून नियमांचे उल्लंघन करणारा योग्य तो धडा शिकेल. (Mumbai Police will ask RTO to cancel license if motorist found riding without helmet)

जर एखादा वाहनचालक हेल्मेटशिवाय आढळला. तर प्रथम त्याचं दंड केला जाईल, नंतर त्याचा तपशील आरटीओला पाठवला जाईल आणि त्यानंतर मग त्याचा परवाना आरटीओ रद्द करेल, जेणेकरून त्याला योग्य धडा मिळेल. याशिवाय नियमाचे उल्लंघन करणार्‍याला वाहतूक पोलिस चौकीत पाठवले जाईल, जिथे त्या व्यक्तीला वाहतूकीच्या नियमांची माहिती देणारे व्हिडीओ दाखवले जातील आणि त्यांना वाहतूक नियमांची (Traffic Rules) चांगली जाणीव आहे आणि अशा प्रकारची कारवाई पुन्हा होणार नाही याची खात्री करण्यासाठी जनजागृती कार्यात गुंतवले जाईल.

बहुतांश अपघातांमध्ये महाविद्यालये आणि शाळांमधील तरुण- तरूणींचा समावेश आहे, हे लक्षात घेऊन वाहतूक पोलीस लवकरच संपूर्ण शहरात व्हिडिओ, व्याख्याने आणि मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. डीसीपी रौशन यांनी शाळा/कॉलेज अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्यासाठी आणि त्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी या उपक्रमात वाहतूक पोलिसांना पाठिंबा द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवारांची अंतिमयात्रा विद्या प्रतिष्ठाण मैदानात दाखल, वातावरण शोकमय

Ajit Pawar Baramati Police : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची पुणे ग्रामीण पोलिसात तक्रार, अपघाताचं नेमकं कारण येणार समोर...

Latest Marathi News Live Update : आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

SCROLL FOR NEXT