crime  Sakal
मुंबई

पाण्याच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवलेले 5.7 कोटींचे हेरॉईन जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई

पाण्याच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवलेले 5.7 कोटी रुपयांचे हेरॉईन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने जप्त केले

सकाळ डिजिटल टीम

पाण्याच्या बाटल्यांमध्ये लपवून ठेवलेले 5.7 कोटी रुपयांचे हेरॉईन मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेच्या युनिटने (Heroin) जप्त केले आहे. या संबंधित दोघांना अटक करण्यात आली आहे. शमीम खान आणि रफिक शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे (Nearly 6 crores' heroin hidden in water bottles seized by Mumbai Police)

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे शमीम खान या महिलेवर गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पथक लक्ष ठेवून होते. गुरुवारी माहिती मिळाली की ही महिला रफिक शेख नावाच्या व्यक्तीसह मानखुर्द येथे हेरॉइनची तस्करी करत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन दोन पाण्याच्या बाटल्या आणि एक पिशवी जप्त केली. धक्कादायक म्हणजे पाण्याच्या बाटल्याच्या तळाशी एक वेगळा डबा होता, ज्यामध्ये हेरॉईन सापडले.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुध्दा हेरॉईन सापडले. त्यानंतर त्यांना NDPS कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली.

आरोपी महिलेवर यापूर्वी किमान दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी तपास करत असून आणखी कारवाई होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT