contenment zone 
मुंबई

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली; तब्बल 'इतक्या' इमारती केल्यात सील...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गाचे रुग्ण ज्या परिसरात आढळतात, तो परिसर सील करण्यात येत असे. परंतु भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएसआर) तत्वानुसार पालिका आयुक्तांनी नियमात काही बदल केले आहेत. त्यामुळे आता कोरोना रुग्ण आढळून येईल ते घर अथवा इमारतीचा भाग (मजला ) सीलबंद केला जातो. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढत आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबरोबर मुंबईतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येतही वाढ होत आहे. आतापर्यंत 756 कंटेन्मेंट झोन असून 6005  इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) जाहिर करण्यात आले असून येथे कडक पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

मुंबईत सध्या 756 कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आले आहेत.  ज्या इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ते घर अथवा परिस्थिती पाहता संबंधित मजला सील करण्यात येतो. सध्या मुंबईत 6005  इमारती सील करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागासह राज्य सरकारची यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. सध्या मुंबईत कोरोनाचा फैलाव हा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथील करण्यात आले असले तरी प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे. 
 
धक्कादायक! मुंबईत मृतांचा आकडा 4 हजार पार; आज दिवसभरात 'इतके' नवे रुग्ण.

मुंबईत अनेक ठिकाणी दाटीवाटीने वसलेला झोपडपट्टीचा परिसर आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग पसरतो. त्यामुळे ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण सापडले असतील त्या  विभागात कंटेन्मेंट झोन जाहिर करून सुरक्षा कडक केली जाते. मुंबईतील धारावी व इतर काही विभागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश येत आहे. जेथे कोरोना आटोक्यात आला आहे, त्या भागातील कंटेन्मेंट झोन काढून तेथील सुरक्षा कमी केली जाते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PV Sindhu: पी. व्ही. सिंधूचा धक्कादायक पराभव; हाँगकाँग ओपन बॅडमिंटन : बिगरमानांकित खेळाडूकडून मात

Asia Cup 2025: बांगलादेशचे मोठ्या विजयाचे लक्ष्य; दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध आज सामना

Sakal Newspaper: 'सकाळ' महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक; देशात ‘टॉप टेन’मध्ये स्थान, ‘एबीसी’चे शिक्कामोर्तब

नेपाळमध्ये मुंबई-पुण्यातील पर्यटक अडकले, २१ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश; सुटकेसाठी सरकारकडे विनंती

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक, चांदी मात्र उतरली; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT