Mumbai Police chief Sanjay Pandey  सकाळ डिजिटल टीम
मुंबई

गुंडगिरीपेक्षा मुंबईकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे

मंगळवारी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

गुंडगिरी किंवा संघटित गुन्हेगारीपेक्षा ध्वनी प्रदूषण, वाहतूक समस्या आणि ड्रग्ज या नागरिकांना भेडसावणाऱ्या मोठ्या समस्या असल्याचे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे म्हणाले. मंगळवारी ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय पांडे म्हणाले, ”मी जेव्हा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा मला वाटले की शहराला त्रास देणारी सर्वात मोठी समस्या गुंडगिरी किंवा संघटित टोळ्या असतील. मात्र जेव्हा सोशल मीडियावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तेव्हा मुंबईत सर्वात मोठी समस्या म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि वाहतूक समस्या जाणवली.” ध्वनी प्रदुषणामुळे मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री झोप येत नाही,असेही पांडे म्हणाले.

संजय पांडे पुढे म्हणाले, “बांधकामे करण्यास विशिष्ट वेळीची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र परवानगीच्या तासानंतरही बांधकामे सुरु ठेवणाऱ्या बिल्डरांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यांना वाटते की आम्ही फक्त मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करू. तथापि, आम्ही लवकरच त्यांची बाँडवर स्वाक्षरी करू, ज्याद्वारे नियम न पाळल्यास त्यांना लाखो रुपयांचा दंड आणि तुरुंगवासही भोगावा लागेल.”

गुन्हेगारीबाबतीत सर्वात मोठे आव्हान विचारले असता पांडे म्हणाले, “ड्रग्सचा धोका हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण पिढी नष्ट होत आहे. मात्र त्या संदर्भात आम्ही योग्य पावले उचलत आहोत.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT