File Photo 
मुंबई

आत्महत्येची भिती दाखवून तो करत होता तरुणीचा मानसिक छळ..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एका तरुणीला मोबाईलवरून सतत कॉल करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या माथेफिरूला वनराई पोलिसांनी अटक केली. धर्मेंद्र चौधरी असे या आरोपीचे नाव असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरुणाला आत्महत्या करणे भाग पाडल्याच्या गुन्ह्यात तिला अटकेची भीती दाखवण्यासाठी त्याने दिल्ली पोलिसांच्या नावाचा गैरवापर केला होता. 

गोरेगाव परिसरात राहणारी ही 23 वर्षांची तरुणी एका कुरिअर कंपनीत वरिष्ठ अधिकारी होती. तेथे अन्य विभागात काम करणाऱ्या धर्मेंद्र चौधरी याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. अनेकदा तो तिला कार्यालयात व वेगवेगळ्या मोबाईलवरून दूरध्वनी करून त्रास देत होता. याबाबत तिने समजावल्यानंतरही त्याने असा त्रास देणे सुरूच ठेवले होते.

तिच्या घरच्या पत्त्यावर त्याने महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. तिने वरिष्ठांना ही माहिती दिल्यावर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. काही महिन्यांनंतर तिनेही या कुरिअर कंपनीतील नोकरी सोडली होती. 
चौधरीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. दिल्ली पोलिस दलातील अधिकारी असल्याचे भासवून, त्याने धर्मेंद्र नावाच्या आत्महत्या केलेल्या तरुणाने सुसाईड नोटमध्ये तिचे नाव लिहिल्याचे सांगितले.

या तरुणाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणीने एका मित्राला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वनराई पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार धर्मेंद्र चौधरी याने केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

One-sided lover arrested for mental harassment of a girl

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'त्या' जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता का? अजित पवार म्हणाले, ''प्रयत्नांती परमेश्वर...''

Kolhapur : ऊसदराचं आंदोलन चिघळलं, आंदोलकांना पोलिसांची धक्काबुक्की; कारखानदारांवर दडपशाहीचे आरोप, Video Viral

Jewellery Shop Robbery Video : ज्वेलरी शॉप लुटण्यासाठी महिलेने दुकानादारांच्या डोळ्यात फेकलं तिखट, पण तिथंच पकडली गेली अन् मग...

महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, अंगावर काटा आणणारा ‘असुरवन’ चित्रपटाचा टीजर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : व्हेल माशाची दीड कोटी रुपयांची उलटी जप्त

SCROLL FOR NEXT