मुंबई

एक अनोखा खटला; हरवलेले बैल सापडले आणि त्याची अटक टळली... 

- सुनीता महामुणकर

मुंबई : पोलिसांनी छापा टाकून सुटका केलेले बैल हरवल्याने एका गोशाळा चालकावर तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. मात्र, याविरोधात चालकाने न्यायालयात धाव घेतली आणि याचवेळी बैलही सापडल्याने त्याची अटक टळली. बैल हरविले म्हणून गोशाळा चालकावर पोलिसांनी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी गोशाळा चालकाला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, हरविलेले बैल गोशाळेतच सापडल्याचे सुनावणीदरम्यान गोशाळा चालकाने सांगितले. 

सोलापूरमध्ये पोलिसांनी मे महिन्यात एका ठिकाणी छापे टाकून पंधराहून अधिक बैलांना ताब्यात घेतले होते. याबाबत एका आरोपीवर गुन्हाही दाखल आला. बैलांचा तात्पुरता सांभाळ करण्यासाठी बैलांना  स्थानिक गोशाळेत ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी एकूण बैलांपैकी चार बैल गोशाळेत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दोन गोशाळा कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी फिर्याद दाखल केली. यामध्ये फसवणूक, विश्वासघात आदी गुन्हे नोंदविण्यात आले. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होऊ शकते या भितीने एका चालकाने बार्शी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. मात्र, पोलिसांनी जामीनाला विरोध केला आणि बैलांच्या तपासासाठी कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने जामीन नामंजूर केला. याविरोधात चालकाने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कौन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी झाली. फौजदारी फिर्यादीमध्ये बैल कसे गायब झाले, हे नमूद केले नाही. त्यामुळे अर्जदाराविरोधात  फक्त शक्यता व्यक्त करणारे आरोप आहेत आणि चारही बैल गोशाळेतच सापडले, असे अर्जदाराकडून सांगण्यात आले आहे.

बैल गोशाळेत आहेत, असे सरकारी वकील अराफत सैत यांनीही न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने कर्मचाऱ्याला जामीन मंजूर केला.

( संकलन - सुमित बागुल ) 

one unique case of bombay high court where bulls saves jail of person

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT