मुंबई

पालघर साधू हत्याकांड प्रकरणः तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे बडतर्फ

संदिप पंडीत

मुंबईः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.  कासा पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समजतंय. १६ एप्रिल २०२० ला मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण बरंच चिघळलं होतं. 

त्यानंतर सुरुवातीला याप्रकरणी कासा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. ही कारवाई केल्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.

या प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख स्वतः पालघरला गेले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३५ पोलिस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली केली होती. 

दरम्यान या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केलंय. तसंच यावरची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होतं आहे. 

याप्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात येत होती. चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांना पोलिस विभागातून बडतर्फ करण्यात आलं.

(संपादनः पूजा विचारे)

Palghar mob lynching case assistant police inspector Anandrao Kale dismissed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT