File Photo 
मुंबई

येथे रेल्वे कर्मचारीच करतात दररोज कायद्याचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे विभागाकडून कोणीही रूळ आेलांडू नये, यासाठी लाखो रुपयांच्या जाहिराती आणि जनजागृती केली जात असताना, परळ रेल्वेस्थानकांवर मात्र परळ वर्कशॉपमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मात्र सामूहिकरित्या दैनंदिन बेकायदेशीर रूळ अोलांडणे (ट्रेस पासिंग) सुरू असल्याचे दिसून आले आहे. परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेकडील पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद केल्याने रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी रूळ अोलांडणे सोयीचे असल्याचे परळ स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकाच्या पुलावर चढताना चेंगराचेंगरीची घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे पुलांची तपासणी केली होती. त्यानंतर परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या या पुलाला धोकादायक घोषित करण्यात आले होते. पुलाची दुरुस्ती वेळेत करण्याचे आदेश होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी 16 मार्चपासून पुलाला बंद करण्यात आले आहे.

मात्र, या पुलावरूनच फलाट क्रमांक चार आणि पाच वर जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने, या फलाटावर येणाऱ्या लोकल मध्ये बसण्यासाठी रेल्वे प्रवाशांना ट्रेस पासिंग करावी लागते आहे. परळ रेल्वे वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांसह सामान्य प्रवासीसुद्धा दैनंदिन ट्रेस पासिंग करताना दिसून येत असून, यादरम्यान दोन रेल्वे पोलिसांनासुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 

रेल्वे कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्यासह सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात ट्रेस पासिंग करत असल्याने, ट्रेस पासिंग करताना प्रवाशांची गर्दी निर्माण होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

प्रवाशांची ट्रेस पासिंग होईपर्यंत या ठिकाणी ड्युटी लावण्यात आली आहे. या फलाटावर पोहचण्यासाठी प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्याने, या मार्गाने त्यांना सोडावे लागते आहे. 
- रेल्वे पोलिस 

फलाटावर जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही. दुरुस्तीसाठी परळ स्थानकावरील सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती करण्यात येत असल्याने पुलाला बंद केल्याने ही परिस्थीती निर्माण झाली आहे. 
- नंदनवार,
स्टेशन मास्तर, परळ 

Railway workers here are violating the law daily

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

2027 मध्ये प्रभासचे 'हे' बिग बजेट प्रोजेक्ट होणार रिलीज !

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Tanzania: टांझानिया : पूर्व आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्तीचा महासाथी

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

SCROLL FOR NEXT