मुंबई

Big Breaking: सचिन वाझेवर मोठी कारवाई; पोलिस आयुक्तांचे आदेश

अनिश पाटील

Sachin Waze Case: अंबानी स्फोटक प्रकरण, मनसुख हत्या प्रकरणात सचिन वाझे मुख्य आरोपी

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार (Antlia Explosive Case) ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथकाने (NIA) वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) अटक केले. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. कालांतराने, स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येतही (Mansukh Hiren Murder Case) सचिन वाझे मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अखेर मंगळवारी सचिन वाझेला पोलिस दलातून (Police Force) बडतर्फ (Dismissed) करण्यात आले. कलम 311 अंतर्गत मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagrale) यांनी ही बडतर्फीची कारवाई केली. (Sachin Waze has been dismissed from Police service after Ambani Explosive Case and Mansukh Hiren Case)

स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानतंर वाझे नियमानुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दोन आठवड्यापूर्वी त्याचा अहवाल आता पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे पाठवण्यात होता, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. या कृत्यामुळे मुंबई पोलिस खात्याची मोठी बदनामी झाली. त्याचे कार्य पोलिस अधिका-याला शोभत नसणारे आहे, तसेच कर्तव्यात कसुर असे अनेक ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

पोलिस हे नागरीकांच्या सुरक्षेसाठी असतात. नागरीकांचे प्रश्न व अडचणी सोडवणे, त्यांना भयमुक्त वातावरणात जगता येईल, अशी स्थिती निर्माण करणे हे पोलिसाचे काम आहे. पण वाझेयाच्याकडून याच्या विपरीत काम झाले. त्यामुळे खाकीची इज्जत धुळीला मिळाली. त्याचे कृत्य हे बेजबाबदार व बेशिस्तीचे आहे. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले.

गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाचा प्रभारी असलेला वाझेला 13 मार्चला एनआयएने अटक केली होती, तर त्याचा सहकारी असलेला रियाझुद्दीन काझीला 11 एप्रिलला अटक करण्यात आली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोघांचाही याप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात सक्रिय सहभाग आढळून आला होते. त्यानंतर मंगळवारी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे यांच्याविरोधात बडतर्फीची कारवाईबाबतचा आदेश जारी केला.

1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झालीगडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 1 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबीत 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Dindori Lok Sabha Election 2024 : 'मविआ'ला मोठा दिलासा! दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

SCROLL FOR NEXT