Shraddha Murder Case
Shraddha Murder Case Sakal
मुंबई

Shraddha Murder Case : मैत्रिणीने श्रद्धासाठी लिहीलेलं भावनिक पत्र

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Walkar Friend Shalaka Desai Letter : श्रद्धाच्या मैत्रिणीने तिच्यासाठी लिहीलेलं हे एक ह्दय पत्र.

ती म्हणतेय...

आधी लोकांनी तिच्या कपड्यांवरून, तिच्या केसांच्या स्टाइलवरून जज केलं आता तुम्ही तिच्या प्रेमात पडण्यावरून, नात्यात तिने केलेल्या निवडीवरून, तिला जज करताय... ती तर निघून गेली.... पण तिला सतत असं एखाद्या पिंजऱ्यात उभं करणं आपण कधी थांबवणार?

श्रद्धाच्याच वयाची एक मुलगी विचारतेय हा प्रश्न

ती मला कामाच्या ठिकाणी भेटली तेव्हा मीसुद्धा माझ्याही नकळत तेच केलं, जे तुम्ही आता करताय.... तिला जज केलं. ओठांवर पियर्स केलेलं. केसांची एकदम वेगळीच स्टाइल... कपड्यांची वेगळीच तऱ्हा... बऱ्याचदा कामावर दांड्या... कोण आहे ही? सुरूवातीला वाटायचं ही काम टाळतेय की काय पण हळूहळू तिच्यातला सच्चेपणा जाणवत गेला. तिच्याशी मैत्री तर झाली पण तिला समजून घेऊ शकेन पूर्ण इतकी मैत्री नाही झाली बहुतेक...

श्रद्धा,

काय लिहिणार आता गं ?

जेव्हा वेळ होती तेव्हा परत एकदा तरी तुझ्याशी बोलायला हव होतं असं आता सारखं वाटतंय.

एकाच टीममध्ये असून आपली मैत्री खूप उशिरा झाली. पण शेवटी झालीच. BMM पूर्ण कर, माझी पुस्तकं घेऊन जा असं हजार वेळा आम्ही तुला म्हटलं असेल पण तू कायम तो विषय टाळलास... तुझी आई तुझ्यासाठी जीव होती. तिच्यासाठी आणि घरासाठी तू किती काय काय करायचीस ते माहितेय मला.

एका बाजूला शॉर्ट कपडे, केसांची एकदम हटके स्टाइल.. एखादी झल्ली आणि टॉमबॉयच वाटेल अशी ही मुलगी नोकरीवर यायच्या आधी घरी स्वयंपाक आणि सगळी कामं आवरुन यायची हे कुणाला सांगितलं तरी खरं वाटेल का गं? पण नाही, लोकांना तुझ्या आतली 'तू' पाहायची, शोधायचीच नव्हती. कारण त्यांच्यासाठी तुझ्या दिसण्यावरुन अंदाज बांधणं सोपं होतं.

तुझ्याबद्दल ही काळी बातमी आली... मी एकदम स्तब्धच झाले. खरोखरच काय करावं सुचेना... सारखं वाटे हे खोटं असावं. त्या बातमीतली 'ती' तू नसावी... पण नव्हतं गं. तूच होतीस ती... तुझ्या नात्याबद्दल आणि त्यातल्या कुरबुरी, तू सहन करत असलेल्या गोष्टी याबद्दल आपण एकत्र काम करतानाही काही गोष्टी कळल्या होत्या.

तेव्हा थोडंफार तुला समजवण्याचा प्रयत्नही केला होता कदाचित पण तरीही ते पुरेसं नाही गं झालं... मधल्या काळात तू दिल्लीला गेलीस, नंबर बदललास मग काही संपर्कच राहिला नाही. आता अचानक बातमी आल्यावर काय बोलावं तेच सुचेना... तू गेल्याचं दु:ख तर आहेच पण आणखी वाईट वाटलं ते सोशल मीडियावर तुला मूर्ख ठरवणाऱ्या, तूच कशी चुकलीस याबाबत वाट्टेल ते बोलणाऱ्या माणसांमुळे....

अरे कोण कुठली लोकं तुम्ही? तिला आधी ओळखतही नसणारे उलट तिच्या एकूण दिसण्यावरूनच तिच्या असण्याविषयी नाही नाही ते अंदाज बांधणारे, तिची खिल्ली उडवणारे, हसणारे लोक तुम्ही... आज अचानक तिच्याबद्दल हे असं घृणास्पद घडल्यावर तिलाच दोष देण्याच्या पोस्टी करायला लागलात ?

ती नेमक्या कोणत्या परिस्थितीत होती, तिला नेमकं काय छळत होतं, सलत होतं माहितेय का आपल्याला? का तिला मूर्ख म्हटल्यावर सगळं संपणारे?

अशा घटना घडल्यावर मुलींना, महिलांना जज करणं आपण कधी थांबवणार आहोत?

आपल्याकडे तर सहज म्हटलं जातं... बाईची जात.. जरा सहन केलं तर कुठे बिघडलं?

पोरींच्या कपड्यांवरून त्यांना जज करायला, नाही नाही ते अंदाज बांधायला सगळे तयार पण तिने एखाद्यावेळी नाही म्हटलं तर ते स्वीकारायला हा समाज तयार होतो का?

नातं वेगळं आणि त्यात असलेली हिंसा वेगळी. जिथे हिंसा आहे तिथे प्रेम नसतं...त्यामुळे थोडीशी हिंसासुद्धा नात्यात सहन करायची नाही. हे आपल्या लेकींना कधी शिकवणार आहोत आपण? त्यांनी जर या शिकवणुकीनुसार निर्णय घेतला तर त्यामागे ठाम उभं राहायला कधी शिकणार आपण?

पण नाही नवऱ्याने टाकलेली किंवा नवऱ्याला सोडून आलेली चवचाल मुलगी.. असले शिक्के मारायला सदैव तयार असतो आपण.

खरंतर बोलण्यासारखं बरंच आहे. पण आता आणखी बोलवत नाही गं...

बाकी श्रद्धा, तुझ्या शॉर्ट कपड्यांवरून, ओठांवर केलेल्या पिअर्सिंगवरून, केसांच्या स्टाइलवरून तुला कायम नावं ठेवणारी, हसणारी, टोमणे मारणारी लोक आज काहीही कारणाने का असेना पण तुझ्यासाठी जीव तोडून बोलताहेत, तुझे मुद्दे मांडत आहेत हे बघून, थोडं बरं वाटलं.

पण तुला आता काहीच फरक पडत नसेल ना गं??

Rest In Peace, Bro!!

- शलाका देसाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana: हरियाणात BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने राज्यपालांकडे मागितली वेळ, जेजेपीनेही फ्लोअर टेस्टसाठी पाठवले पत्र

INDW vs BANW 5th T20I : भारतीय महिला संघाकडून बांगलादेशला व्हाईट वॉश; पाचव्या सामन्यातही दिली मात

Firecracker Factory Blast: शिवकाशीतल्या फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू

Bajrang Punia: बजरंग पुनिया निलंबन प्रकरणाला नवं वळण; भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून परदेशात ट्रेनिंगसाठी निधी मंजूर, मात्र...

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सांताक्रूझ आणि गोरेगावमध्ये वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT