मुंबई

कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये दिसतोय 'या' आजाराची लक्षणे; दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला...

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून अनेक नवनवीन संशोधने समोर आले. शिवाय रुग्णांमधील लक्षणांची स्वरूपही वेगवेगळे दिसून आले. कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये इतर वेगळे आजार उद्भवत असल्याचेही निदर्शनास आले. आता तर  कोरोनाव्हायरसमुळे काही रुग्णांमध्ये चेहेऱ्याचा पक्षाघात झाल्याच्या घटना आढळून आल्या आहेत. पाच महिन्यांपासून रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या ही बाब निदर्शनास आली असून त्याला  "बेल्स पालसी" असे म्हटले जाते. त्यामुळे कोरोना सोबत रुग्णामध्ये या आजाराची भीती निर्माण झाली आहे.

कोरोना संसर्ग पसरल्यानंतर एप्रिल ते जुलै दरम्यान बेल्सच्या पक्षाघाताची अनेक उदाहरणे आढळली. कोरोनाची रुग्णसंख्या मुंबईत कमी होत असली तरी बेल्स पालसीच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे, असे फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील न्यूरोलॉजिस्ट राजेश बेनी यांनी सांगितले. इतकेच नाही तर कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या परिसरात बेल्सच्या पक्षाघाताचे प्रमाण वाढत असल्याचे ते पुढे म्हणाले.

इतर देशांमधील डॉक्टरांनाही कोरोना आणि बेल्सच्या पक्षाघात सारख्या आजारांचा एकमेकांशी संबंध असल्याची जाणीव झाली आहे. चीनच्या डॉक्टरांनीही पीअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये "बेल्स पालसी" हे कोव्हिड चाचणीतून स्पष्ट झाले असल्याचे सांगितले. चेहऱ्याच्या एका बाजूला अर्धांगवायूची लक्षणे जाणवल्यास न्यूरोलॉजिस्टकडे जाणे गरजेचे आहे. हो कोविड ची सुरुवात असू शकते. अशाच प्रकारे ताप, श्वास लागणे किंवा खोकला यासारखे कोविडीसी लक्षणे असलेल्या रुग्णांची न्यूरोलॉजिस्ट ने तपासणी केली. न्युरोलॉजिस्टकडे गेलेल्या रुग्णांचा एमआरआय आणि सीटी स्कॅन नॉर्मल आला. मात्र त्यानंतर केलेल्या कोव्हिड चाचणीमध्ये त्यांना कोव्हिड असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हाच हा आजार कोव्हिडमुळे झाल्याचे समोर आले.

मुंबईत सुरूवातीच्या टप्प्यात कोरोना व्हायरसच्या तपासणीचे नियम कठोर होते.  बेल्सच्या पक्षाघात सारख्या न्यूरोलॉजिकल लक्षण असलेल्या रूग्णात कोव्हिडचा संशय आला असला तरीही आम्हाला चाचणीसाठी एखादे प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची परवानगी नव्हती.  त्यावेळी केवळ श्वासोच्छवासाची स्थिती आणि प्रवासाचा इतिहास असल्यास रूग्णांना चाचण्या घेण्याची परवानगी होती, असे ही एका वरिष्ठ डॉक्टरांनी म्हटले. परंतु बेल्सच्या पक्षाघात झालेल्या बर्‍याच रूग्णांना काही अपवादांसह सौम्य कोव्हिड संसर्ग झाल्यासारखे दिसते आहे. मात्र बहुतेकांना हॉस्पिटलायझेशनची गरज नसते असे ही ते पुढे म्हणाले.

परळच्या केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत म्हणाल्या की, सामान्यत: बेल्सच्या पक्षाघात बरा होण्यास एक किंवा दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु काही प्रकरणांमध्ये तो उर्वरित अशक्तपणा मागे ठेऊन जात असल्याचे दिसते. अशा रुग्णांवर सामान्यत: व्हायरल कारणीभूत असल्याने आम्ही या अवस्थेस अँटीव्हायरल आणि स्टिरॉइड्सने उपचार करतो असे ही त्या पुढे म्हणाल्या. बेल्सचा पक्षाघात काही रुग्णांमध्ये वेदनादायक असू शकतो.  “डोळ्याची बुबुळे आणि पापण्या हलू शकत नाहीत.  प्रभावित बाजूस गाल आणि खालच्या जबड्यातही हालचाल होऊ शकत नाहीत, असे डॉ. रावत म्हणाल्या.  रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी फिजिओथेरपीची आवश्यकता असू शकते असे ही त्यांनी सांगितले.

  • "बेल्स पालसी" काय आहे?
  • चेहर्‍याच्या एका बाजूला पक्षाघात किंवा अशक्तपणा येतो.
  • चेहऱ्याच्या मज्जातंतूचे कार्य प्रभावित झाल्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूवर परिणाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील भाव दर्शविण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
  • अश्रूग्रंथी, लाळ ग्रंथी, कान व जीभेच्या मध्यभागीही परिणाम होऊ शकतो.
  • दोन तासांच्या कालावधीत अचानक लक्षणे दिसतात आणि काही आठवड्यांनंतर किंवा उपचार न घेता सुधारतात
  • लक्षणांमधे चेहर्‍याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा, तोंड कोरडे होणे, निखळणे आणि डोळा बंद करणे अशक्य होणे (डोळ्यातील कोरडेपणा) यांचा समावेश आहे.
  • तणाव, झोपेची कमतरता, शारीरिक आघात, किरकोळ आजार किंवा ऑटोइम्यून सिंड्रोमपासून दुर्बल प्रतिरक्षा होण्याची शक्यता उद्भवते.

----
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT