rajesh tope 
मुंबई

'त्या' आदेशात स्पष्टता नाही, लॉकडाऊनच्या नियमांबाबत आरोग्य मंत्र्यांचे संकेत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील लॉकडाऊनच्या नियमात 3 मेपर्यंत कुठलेही बदल होणार नसल्याचे संकेत आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणण्याची घोषणा केली; मात्र त्या आदेशात स्पष्टता नसल्याचे मत टोपे यांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी (ता. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार आहे. त्यानंतर या संदर्भात अधिक स्पष्टता येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊमध्ये काही दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशावर राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांत कुठलीही सूट मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत स्थलांतरित कामगारांना परत पाठवण्याविषयी चर्चा केली जाईल. त्यानंतरच राज्य सरकार अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या कामगारांना परत आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू?
राज्यातील उद्योग सुरू झाले पाहिजेत, ही राज्य सरकारची भूमिका आहे. ग्रीन झोन जिल्ह्यांमधील उद्योग पुन्हा सुरू करता येतील. या जिल्ह्यांच्या सीमा बंद आणि उद्योग सुरू राहतील, असे आरोग्यमंत्री म्हणाले. 

रेड झोनबाबत नंतर निर्णय
पुणे, मुंबईसारख्या कोरोना रेड झोन  भागांत लॉकडाऊन वाढवायचा की नाही, यासंदर्भात निर्णय नंतर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रेड झोनमधील केवळ अधिक प्रभावित भाग सील करायचा की संपूर्ण झोनमध्ये लॉकडाऊन कायम ठेवायचा याबद्दल व्यापक विचार करून राज्य सरकार निर्णय घेईल, असेही डॉ. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Strict lockdown rules until May 3 Indications of the Minister of Health

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

Amravati Crime News : साहील लॉनमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे खून; अमरावतीत १७ वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी मोठा खुलासा...

Pune Temperature : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुणे शहर परिसरात थंडीचा प्रभाव

Black Magic : भूतबाधेच्या अंधश्रद्धेतून विवाहितेवर अमानुष हल्ला; पाच वर्षांच्या मुलासमोरच कडुलिंबाच्या काठ्यांनी क्रूरपणे मारहाण

SCROLL FOR NEXT