मुंबई

दीड तासाचा लेटमार्क, तेजस एक्सप्रेसच्या 630 प्रवाशांना 100 रुपये भरपाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणाऱ्या दुसऱ्या खासगी तेजस एक्सप्रेसला तिसऱ्याच दिवशी दीड तासाचा लेटमार्क लागला. पश्चिम रेल्वे मार्गावरील आज (ता.22) दुपारच्या वेळेत दहिसर ते भाईंदर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, त्याचा फटका तेजस एक्सप्रेसला बसला. परिणामी इंडियन कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी) या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या तब्बल 630 प्रवाशांना प्रत्येकी 100 रुपये आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. 

खासगी तेजस एक्सप्रेसला काही कारणास्तव विलंब झाला तर प्रवाशांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येते. बुधवारी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या अप जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. परिणामी ट्रेनचा विद्युत पुरवठा बंद झाला.  दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास दहिसर ते मीरा रोड दरम्यानचा ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा सुरळित करण्यात आला. परंतु मीरा रोड ते भाईंदर दरम्यानचा विदयुत पुरवठा दुपारी 1.30 वाजता सुरु करण्यात आला. 

या बिघाडामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्याच्या 4 गाड्यांना विलंब झाला. तर उपनगरीय मार्गावरील लोकलच्या 8 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्याचबरोबर मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस देखील खोंळबल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

तेजस एक्सप्रेस अहमदाबादहून सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी सुटुन मुंबई सेंट्रलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पोहोचते. तर परतीच्या प्रवासासाठी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी निघालेली तेजस रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी अहमदाबादला पोहोचते. मात्र बुधवारी दुपारी झालेल्या बिघाडामुळे मुंबईत येणाऱ्या तेजस एक्सप्रेस खोळंबली. परिणामी 1 तास 30 मिनिटांचा विलंब तेजसला झाला.

या गाडीने प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांच्या विनंतीनुसार अंधेरी स्थानकात एक्सप्रेसला 2 मिनिटांचा थांबा देण्यात आला. तर काही प्रवाशांनी गाडीला विलंब झाल्याने त्यांचे पुढील प्रवासाचे विमान चुकल्याचे सांगितले. बुधवारी तेजस एक्सप्रेसने 630 प्रवाशांनी प्रवास केला. परिणामी या प्रवाशांना प्रत्येकी 100 रुपये देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला असून प्रवाशाना नुकसानभरपाईचे पैसे हे बँकेतील खात्यामध्ये जमा होतील, असे आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालयन यांनी सांगितले.

tejas express reached one and half hour late IRCTC will pay 100 rs as compensation 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT